Join us  

WHAT? सलमाननं रागारागात साईन केला होता ‘तेरे नाम’! ‘त्या’ लुकमागे आहे एक इंटरेस्टिंग स्टोरी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 8:00 AM

Salman Khan : सलमान खान सध्या ‘अंतिम- द फायनल ट्रूथ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं भाईजानने असा काही खुलासा केला की, सगळेच अवाक् झालेत.

सलमान खान  (Salman Khan ) सध्या ‘अंतिम- द फायनल ट्रूथ’ (Antim: The Final Truth) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. काल शुक्रवारी हा सिनेमा रिलीज झाला. याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सलमाननं अलीकडे ‘सारेगामापा’ (Sa Re Ga Ma Pa)  या सिंगींग रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर हजेरी लावली. यावेळी भाईजानने असा काही खुलासा केला की, सगळेच अवाक् झालेत.निलांजना नावाच्या एका कंटेस्टंटने सलमानच्या ‘तेरे नाम’  (Tere Naam ) या चित्रपटाचं गाणं सादर केलं. हे गाणं ऐकून सलमानच्या अनेक आठवणी ताज्या झाल्यात. हाच धागा पकडून त्याने ‘तेरे नाम’चा एक किस्साही सांगितला. होय, ‘तेरे नाम’मधील सलमानच्या लुकमागे एक इंटरेस्टिंग कहाणी आहे. जी फार कमी लोकांना ठाऊक आहे.

सलमानने सांगितलं, ‘तेरे नाम या चित्रपटाचे निर्माते आणि माझे जवळचे मित्र मनचंदा माझ्याकडे आले, तेव्हा मी एका दुस-या सिनेमाचं शूट करत होतो. तुला माझ्या चित्रपटासाठी टक्कल करावं लागेल, असं त्यांनी मला सांगितलं. मी टक्कल कसं करणार? असा प्रश्न मला पडला होता. कारण मी दुस-या एका चित्रपटाचं शूटींग करत होतो. मी त्यांना काहीही आश्वासन देऊ शकलो नव्हतो. याचदरम्यान एक दिवस मला ताप होता आणि तो दुस-या चित्रपटाचा दिग्दर्शक मला सतत फोन करून शूटींयला ये म्हणून त्रास देत होता. मी इतका वैतागलो की, रागारागात बाथरूमध्ये गेलो आणि टक्कल केलं. दुस-याच दिवशी मी तेरे नामच्या निर्मात्यांना फोन केला आणि मी टक्कल केलंय व मी तुमचा चित्रपट करण्यासाठी तयार आहे, असं म्हणालो. खरं तर प्रत्येकजण मी हा सिनेमा करू नये, या मताचा होता. अनेकांनी मला तो साईन करू नकोस असा सल्ला दिला होता. पण का कुणास ठाऊक मला हा सिनेमा करायचा होता. ’

तुम्हाला ठाऊक आहेच की, ‘तेरे नाम’ या चित्रपटात सलमान वेड्यांच्या रूग्णालयात पोहोचतो, तेव्हा त्याचं जवळपास टक्कल दाखवलं आहे. त्याआधी तो लांब केसांत दिसतो. त्याची ती हेअरस्टाईलही त्यावेळी चर्चेत आली होती.‘तेरे नाम’ हा सिनेमा 2003 साली रिलीज झाला होता. सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केलेला सलमानचा करिअरमधील हा एक सुपरहिट सिनेमा आहे. या चित्रपटाची गाणीही प्रचंड गाजली होती. हिमेश रेशमियाने चित्रपटासाठी 13 गाणी दिली होती. सर्व गाणी उत्तम होती. पण त्यापैकी फक्त 7 निवडली गेलीत.

टॅग्स :सलमान खान