Join us  

 सोपू अदालत में तू दोषी है...! सलमान खानला पुन्हा मिळाली जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 10:23 AM

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

ठळक मुद्देगतवर्षी लॉरेन्स बिश्नोई या स्थानिक गुंडाने सलमानला जीवे मारण्याची खुली धमकी दिली होती.

काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फेसबुकवरच्या ‘सोपू’ ( Students Organisation of Panjab University) नामक ग्रुपने ही धमकी दिली आहे. या धमकीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.‘सोपू’च्या फेसबुक पेजवर गॅरी शूटर नामक तरूणाने ही धमकीची पोस्ट केली आहे. या पोस्टसोबत सलमानचा एक चर्चित फोटो शेअर केला आहे. या फोटोवर लाल रंगाने क्रॉस मार्क करण्यात आले आहे. ‘सोच ले सलमान तू भारत के कानून से बच सकता है लेकिन बिश्नोई समाज और सोपू पार्टी के कानून ने तुझे मौत की सजा सुना दी है. सोपू अदालत में तू दोषी है,’ असे या पोस्टमध्ये लिहिले आहे.

येत्या 27 सप्टेंबरला सलमानला काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयात हजर व्हायचे आहे. सलमान न्यायालयात हजर झाला नाही तर त्याचा जामीन रद्द होणार आहे.  जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणी सलमानला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर सलमानने याविरोधात सत्र न्यायालयात अपील केले होते. त्याचीच सुनावणी येत्या 27 सप्टेंबरला होऊ घातली आहे.

याआधीही मिळाली आहे धमकीगतवर्षी लॉरेन्स बिश्नोई या स्थानिक गुंडाने सलमानला जीवे मारण्याची खुली धमकी दिली होती. ‘आता आम्ही जे ही करू ते सर्वांदेखत करून. सलमानला तर आम्ही जोधपूरमध्येच मारू,’ असे त्याने म्हटले होते. काळवीट शिकार प्रकरणामुळे बिश्नोई समाजात सलमानविरोधात संतापाची भावना आहे. याच पार्श्वभूमीवर बिश्नोई समाजाशी संबंधित लॉरेन्स बिश्नोईने जोधपूर कोटार्बाहेर सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

  

टॅग्स :सलमान खान