Join us  

अन् सलमान खान म्हणाला, अपना आॅस्कर से क्या लेना-देना भाई...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 9:25 PM

‘आॅस्कर’ पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून ‘विलेज रॉकस्टार्स’ची निवड झाली. पण बॉलिवूडच्या एका सुपरस्टारला मात्र याची भणकही नाही. या सुपरस्टारचे नाव आहे, सलमान खान.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘विलेज रॉकस्टार्स’ या आसामी चित्रपटाची प्रतिष्ठेचा समजल्या जाणा-या ‘आॅस्कर2019’साठी भारताकडून निवड करण्यात आली आहे. ‘पद्मावत’, ‘राजी’, ‘पीहू’, ‘कडवी हवा’ आणि ‘न्यूड’ यांसारख्या चित्रपटांना मागे टाकत ‘विलेज रॉकस्टार्स’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. ‘आॅस्कर’ पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून या चित्रपटाची निवड झाली. पण बॉलिवूडच्या एका सुपरस्टारला मात्र याची भणकही नाही. या सुपरस्टारचे नाव आहे, सलमान खान. होय, भारताकडून कुठला चित्रपट आॅस्करसाठी गेला, याबद्दल त्याला कुठलीही माहिती नाही.‘लवयात्री’ या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत सलमानचे हे अज्ञान जगापुढे आले. या पत्रपरिषदेत काही पत्रकारांनी सलमानला भारताकडून आॅस्करसाठी गेलेल्या ‘विलेज रॉकस्टार’ या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारला. पण यावरचे सलमानचे उत्तर ऐकून सगळेच अवाक् झालेत. सर्वात आधी सलमानला हा प्रश्नचं कळला नाही. कारण त्याला त्याबद्दल कुठलीही माहिती नव्हती. संपूर्ण ‘रामायण’ सांगितल्यावर सलमानच्या डोक्यात जरा कुठे प्रकाश पडला. पण यानंतरही ‘अपना क्या लेना देना आॅस्कर से भाई,’ असे तो म्हणाला. सलमानच्या या वाक्यावर सगळीकडे खसखस पिकली नसेल तर नवल.दिग्दर्शिका रिमा दास यांनी ‘विलेज रॉकस्टार’ केवळ २५ लाखांत बनवला, असे सलमानला सांगितले असता, ‘उनको बोलो की मुझसे आकर मिले. मैं उनके साथ ज्यादा फिल्में बनाऊंगा. मेरी लाइफ तो सेट है,’ असे सलमान म्हणाला.

‘विलेज रॉकस्टार्स’ हा चित्रपट एका १० वर्षांच्या धुनु नामक मुलीची कथा आहे. स्वत:चे गिटार खरेदी करण्याचे तिचे स्वप्न असते़ आपल्या आजुबाजूच्या मुलांना एकत्र करून ती ‘द रॉकस्टार्स’ नावाचा म्युझिक बँड बनवू इच्छिते. भनिता दास आणि बसंती दास यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.

टॅग्स :सलमान खानऑस्कर