Join us  

भाईजान सलमान खान आता घेऊन येणार हॉरर सिनेमा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 2:03 PM

भाईजान सलमान खान सध्या ‘दबंग 3’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. आता सलमानने आणखी एक चित्रपट प्रोड्यूस करण्याची तयारी चालवली आहे. ताजी बातमी खरी मानाल तर, सलमान एका हॉरर अर्थात भयपटाची निर्मिती करणार आहे

ठळक मुद्दे ‘दबंग 3’चे शूटींग करतोय. यानंतर संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात तो दिसणार आहे. याशिवाय त्याचा ‘भारत’ हा चित्रपट येत्या ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय.

भाईजान सलमान खान सध्या ‘दबंग 3’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. आता सलमानने आणखी एक चित्रपट प्रोड्यूस करण्याची तयारी चालवली आहे. ताजी बातमी खरी मानाल तर, सलमान एका हॉरर अर्थात भयपटाची निर्मिती करणार आहे. सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसने एका चित्रपटाचे टायटल रजिस्टर केले आहे. हा चित्रपट एक हॉरर जॉनर आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘आदमखोर’. यापूर्वी सलमाने अभिनेता म्हणून वा निर्माता म्हणून कधीही हॉरर जॉनरचा चित्रपट केलेला नाही. आता त्याचा हा हॉररपट किती यशस्वी ठरतो ते बघूच.

सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसचा ‘नोटबुक’ हा सिनेमा अलीकडेच प्रदर्शित झाला. मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन बहल आणि सलमानच्या मित्राचा मुलगा जहीर इक्बाल यांनी या चित्रपटातून डेब्यू केला होता. पण बॉक्सआॅफिसवर म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा हा डेब्यू फसला.

२०११ मध्ये सलमानने ‘सलमान खान बीर्इंग ह्युमन प्रॉडक्शन’ची सुरुवात केली. ‘चिल्लर पार्टी’ हा सलमानची निर्मिती असलेला पहिला चित्रपट होता. यानंतर ‘शिक्षणाच्या आईचा घो’ या मराठी चित्रपटाची निर्मिती त्याने केले. २०१४ मध्ये  सलमानने ‘एसकेएफ’ या दुसºया प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत सलमानने ‘हिरो’,‘बजरंगी भाईजान’,‘नोटबुक’ आदी चित्रपटांची निर्मिती केली. छोट्या पडद्यावरचा कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ही सलमानची निर्मिती आहे.सलमान तूर्तास ‘दबंग 3’चे शूटींग करतोय. यानंतर संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात तो दिसणार आहे. याशिवाय त्याचा ‘भारत’ हा चित्रपट येत्या ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय.

टॅग्स :सलमान खान