Join us

सलमान खानला दिल्या जात असलेल्या व्हीआयपी ट्रिटमेंटमुळे अन्य कैद्यांचे नातेवाईक नाराज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 14:33 IST

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा भोगत असलेला अभिनेता सलमान खान सध्या जामीन मिळविण्यासाठी धडपड करताना दिसत ...

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा भोगत असलेला अभिनेता सलमान खान सध्या जामीन मिळविण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. सध्या त्याच्या जामिनावर सुनावणी सुरू असून, लवकरच त्याला बेल मिळणार की जेल हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सध्या सलमान खान जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. मात्र त्याच्यामुळे अन्य कैद्यांना बºयाचशा अडचणी उद्भवत असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांकडून केला जात आहे. अनेकांनी सलमानबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. खरं तर कारागृह प्रशासन सलमान खानवर जरा जास्तच मेहरबान असल्याचे दिसत आहे. कारागृहाच्या नियमानुसार, कैद्याला भेटण्याचा वेळ आणि भेटणाºयांची संख्या निश्चित आहे. १५ दिवसांत किमान तीन भेटी घेता येतात. या संख्येत बदल करण्याचा अधिकार सर्वस्वी कारागृह अधीक्षकांकडे असतो. मात्र हा नियमातून सलमानला पूर्णपणे मोकळिक दिल्याचे दिसत आहे.  कारण शुक्रवारी सलमानला चार लोकांना भेटू दिले. कारागृह प्रशासनाच्या या सलमानवरील मेहरबानीमुळे अन्य कैद्यांच्या नातेवाइकांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी सर्वांत अगोदर सलमानचा बॉडीगार्ड शेरा त्याला भेटण्यास गेला. त्यानंतर प्रिटी झिंटा अन् नंतर अलवीरा आणि अर्पिता या दोघी बहिणी त्याला भेटण्यासाठी गेल्या होत्या. यादरम्यान, तिथे उपस्थित असलेले लोक त्यांच्याशी सेल्फी आणि आॅटोग्राफ घेताना बघावयास मिळाले. दरम्यान, सलमानचे प्रकरण सुरू असताना रात्री उशिरा न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांच्यासह अन्य ८७ न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे सलमानच्या जामिनावरील निर्णयात अडथळे तर येणार नाहीत ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, सलमानला कारागृह व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा दावा कारागृह प्रशासनाने फेटाळून लावला आहे.