Join us  

जुही चावलासोबत लग्न करायचे होते या सुपरस्टारला, वडिलांकडे घातली होती लग्नाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:48 PM

या अभिनेत्याने जुहीच्या वडिलांकडे लग्नाची मागणी देखील घातली होती. त्यानेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती.

ठळक मुद्देसलमान या मुलाखतीत सांगत आहे की, ती खूप चांगली आणि गोंडस मुलगी आहे. मी जुहीसोबत लग्न करू शकतो का असे मी तिच्या वडिलांना देखील विचारले होते. पण त्यांनी यासाठी नकार दिला.

जुही चावला गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करत आहे. ती जास्तीत जास्त वेळ तिच्या कुटुंबियांना देते. 1995 मध्ये जुहीने प्रसिद्ध व्यवसायिक जय मेहतासोबत लग्न केले. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. जुहीचा आज वाढदिवस असून तिने नव्वदीच्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. जुहीच्या अभिनयासोबतच त्याकाळात तिच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा रंगली होती. तिच्या हास्यावर तर सगळेच फिदा होते. केवळ सामान्य लोकच नव्हे तर बॉलिवूडमधील एका अभिनेत्याला देखील जुही प्रचंड आवडायची. त्यानेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. या अभिनेत्याने जुहीच्या वडिलांकडे लग्नाची मागणी देखील घातली होती. जुहीचे आज लग्न झाले असले तरी हा अभिनेता आजही अविवाहित आहे.

सलमानने जुही चावलासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सलमानची एक जुनी मुलाखत काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या मुलाखतीत सलमान जुहीची खूप सारी प्रशंसा करत असताना आपल्याला दिसत आहे. सलमान या मुलाखतीत सांगत आहे की, ती खूप चांगली आणि गोंडस मुलगी आहे. मी जुहीसोबत लग्न करू शकतो का असे मी तिच्या वडिलांना देखील विचारले होते. पण त्यांनी यासाठी नकार दिला.

जुही आणि सलमान कधीच नायक-नायिका म्हणून कोणत्या चित्रपटात झळकले नाहीत. जुहीने करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात 2014 मध्ये सांगितले होते की, मी अनेक समांरभात त्याच्याकडे पाहाते पण तो मला पाहून अक्षरशः पळ काढतो असे मला वाटते. कधी कधी तर मला पाहून मला तो ओळखतच नाही अशाप्रकारे वागतो.

दिवाना मस्ताना या चित्रपटात अनिल कपूर, गोविंदा आणि जुही चावला मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला होता. तसेच सलमानच्या बिग बॉस या रिॲलिटी शो मध्ये एकदा जुहीने तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. 

टॅग्स :जुही चावला सलमान खान