Join us  

अशी दिसते सलमान खानची चिमुकली भाची आयत शर्मा, फोटो पाहून म्हणाल SO CUTE!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 3:30 PM

सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता खान हिची मुलगी आयत हिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

ठळक मुद्देअर्पिता खान शर्माचे हे दुसरे अपत्य आहे.

सुप्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांची दत्तक कन्या आणि सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता खान हिची मुलगी आयत हिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अर्पिताचा पती आयुष शर्मा याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत आणि ते क्षणात व्हायरल झालेत. चिमुकल्या आयतच्या आगमनाने खान व शर्मा कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. मामू सलमानही आनंदात आहे.सलमान खानच्या वाढदिवशीच अर्पिताने आयतला जन्म दिला. भाईजानच्या 54 व्या वाढदिवशी त्याला एक अनमोल गिफ्ट देणार असल्याचे अर्पिताने आधीच जाहीर केले होते. त्यानुसार, अर्पिताने सलमानच्या वाढदिवशी म्हणजे गत 27 डिसेंबरला सी सेक्शनद्वारे  गोंडस मुलीला जन्म दिला.

काल आयतचा सलमानसोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. आज पापा आयुष शर्माने आयतचे आणखी काही फोटो शेअर केलेत.

‘आयत, या सुंदर जगात तुझे स्वागत आहे. तू आमच्या आयुष्यात खूप सारा आनंद घेऊन आलीस. तू सर्वांच्या आयुष्यात कायम आनंद पेरशील, अशी आशा करतो,’ असे आयुषने हे फोटो शेअर करताना लिहिले आहे.

या फोटोतील आयत इतकी क्यूट आहे की, चाहते तिची प्रशंसा करताना थकत नाहीयेत.  अर्पिता खान शर्माचे हे दुसरे अपत्य आहे. 18 नोव्हेंबर 2014 मध्ये अर्पिताने तिच्यापेक्षा एक वर्ष लहान बॉयफ्रेन्ड आयुष शमार्सोबत लग्न केले. आयुष हा हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्ठित राजकीय घराण्याचा वारसदार आहे. अर्पिता आणि आयुष यांना आहिल नावाचा एक मुलगा आहे.

मुळात सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम अहिलवर करतो. मामा-भाच्याच्या जोडीचे प्रेम चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे. त्यामुळे आता अहिलनंतर मामा सलमानचे अर्पिताच्या मुलीचे बॉन्डींग कसे बनणार हे ही पाहणे रंजक असणार आहे. 

टॅग्स :सलमान खानअर्पिता खानआयुष शर्मा