Join us  

Kisi ka bhai kisi ki jaan: लांब केस, डॅशिंग जॅकेट; 'बॉलिवूडचा भाईजान' Salman Khan च्या लुकवर चाहते फिदा !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 10:01 AM

आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाचे शुटिंग पूर्ण झाले असून त्याचा फोटो स्वत: सलमान खाननेच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Kisi ka bhai kisi ki jaan : अभिनेता सलमान खानचा प्रत्येक सिनेमातील लुक चर्चेत असतो. आता भाईजानचा नवीन लुक समोर आला आहे. त्याचा आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाचे शुटिंग पूर्ण झाले असून त्याचा फोटो स्वत: सलमान खाननेच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

लांब केस, डोळ्यावर गॉगल, ढिंच्यॅक जॅकेट असा काहीसा सलमान खानचा लुक दिसतोय. यामध्ये तो नेहमीप्रमाणेच डॅशिंग दिसतोय. फोटोतुन हा एक (dance sequence) डान्स सिक्वेन्स असल्यासारखे वाटते. मागे बॅकग्राऊंड डान्सर्स दिसत आहेत तर सलमान खान स्टायलिश पोझ मध्ये उभा आहे.

सलमानच्या या लुकवर चाहतेही फिदा झालेत. हॅंडसम, डॅशिंग लुक, सबके भाईजान अशा कमेंट्स पोस्टवर येत आहेत. हा लुक बघुन तर सिनेमाची उत्सुकता प्रचंड ताणली आहे. काही महिन्यांपुर्वी सिनेमाच्या टायटलची घोषणा करण्यात आली होती. त्यात सलमान खानचे वाळवंटातील शुट दाखवले आहे.

सिनेमाचे नाव आधी 'कभी ईद कभी दिवाली' असे ठेवण्यात आले होते. मात्र यानंतर ते बदलुन 'किसी का भाई किसी की जान' हे नाव फायनल करण्यात आले.  'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये (Eid) ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. सलमान आपल्या चित्रपटातुन अनेक नवीन कलाकारांना संधी देत असतो. याही सिनेमात त्याच्यासोबत (Shehnaaz Gill) शहनाझ गिल डेब्यु करत आहे. तसेच पलक तिवारी, मालविका शर्मा, सिद्धार्थ निगम हे कलाकार देखील असणार आहेत. 

या सिनेमात पहिल्यांदाच सलमान खान आणि पुजा हेगडे या दोघांची जोडी बघायला मिळणार आहे. तर बिग बॉस १६ मधील स्पर्धक अब्दुल रोझिक याची सुद्धा छोटी भुमिका असल्याची चर्चा आहे. फरहाद सामजी यांच्या दिग्दर्शनाखाली सिनेमाचे शुटिंग पुर्ण झाले आहे. 

टॅग्स :सलमान खानपूजा हेगडेशेहनाझ गिलहिंदीसिनेमा