Join us  

भाईजानसाठी काय पण...! सलमानच्या ‘या’ सिनेमासाठी प्रेक्षकांनी ‘आयपीएल’कडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 2:48 PM

टीआरपी चार्टवर अव्वल...

ठळक मुद्देसूरज बडजात्याच्या ‘हम साथ साथ है’ या सिनेमात सैफ अली खान, सलमान खान, मोहनीश बहल, तब्बू, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहे. 

सलमान खान सध्या ‘बिग बॉस 14’ होस्ट करतोय. ‘बिग बॉस ’चा हा सीझनही गेल्या सीझनइतकाच गाजेल, अशी अपेक्षा होती. पण सध्या तरी टीआरपीच्या रेसमध्ये हा शो फार कमाल दाखवू शकला नाही. पण म्हणून भाईजानची क्रेज कमी झालेली नाही. इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल सुरु असतानाही सलमानच्या 1999 साली रिलीज झालेल्या ‘हम साथ साथ है’ या सिनेमाने जबरदस्त टीआरपी मिळवला आहे. हिंदी मुव्ही चॅनल्सवर या चित्रपटाने धम्माल करत सर्वाधिक टीआरपी मिळवला.

टीव्हीवर प्रसारित कार्यक्रमांचे विश्लेषण करणा-या ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ऑफ इंडियाच्या (बार्क) ताज्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. हिंदी मुव्ही चॅनल्समध्ये कायम सोनी मॅक्स व स्टार गोल्डची चलती दिसते. मात्र गेल्या आठवड्यात झी सिनेमाने बाजी मारली. ती सुद्धा ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या जोरावर. झी सिनेमावर प्रसारित झालेला ‘हम साथ साथ है’ हा सिनेमा सर्वाधिक पाहिला गेला. साहजिकच टीआरपी चार्टवर हा सिनेमा अव्वल स्थानी पोहोचला.

सूरज बडजात्याच्या या सिनेमात सैफ अली खान, सलमान खान, मोहनीश बहल, तब्बू, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहे. 

आयपीएल दुस-या क्रमांकावर‘हम साथ साथ है’ या सिनेमाने टीआरपी शर्यतीत आयपीएल सामन्यांनाही मात दिली. गेल्या आठवड्यात आयपीएल सामन्यांऐवजी ‘हम साथ साथ है’ सर्वाधिक लोकांनी पाहिला. स्टार गोल्डवर प्रसारित आयपीएल यामुळे दुस-या क्रमांकावर राहिले. टीआरपीत तिसºया क्रमांकावर ‘केजीएफ- चॅप्टर 1’ तर चौथ्या क्रमांकावर ‘हाऊसफुल 4’ने स्थान मिळवले.

...तर पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणार सलमान खानचा 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'?

क्या बात! आता सलमान खानच्या परिवारानेही खरेदी केली क्रिकेट टीम, क्रिस गेल असणार टीमचा 'बॉस'

टॅग्स :सलमान खान