Join us  

‘राधे’चा फर्स्ट हाफ पाहून चक्क रडू लागला KRK; पण का? एकदा बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 4:34 PM

केआरके अर्थात कमाल आर खानची ही प्रतिक्रिया पाहून भाईजानलाही 'हसावे की रडावे' कळणार नाही. 

ठळक मुद्दे‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या निमित्ताने  केआरकेने अक्षय कुमारवर निशाणा साधला होता.

सलमान खानचा (Salman Khan) ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe: Your Most Wanted Bhai) हा सिनेमा आज ओटीटीवर रिलीज झाला आणि  ट्विटरवर भाईजानच्या चाहत्यांच्या पोस्टचा जणू पूर आला. चाहत्यांनी भरभरून भाईजानच्या सिनेमाचे कौतुक केले. अ‍ॅक्शनपॅक्ड, ब्लॉकबस्टर, परफेक्ट असे लिहित भाईजानच्या चाहत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या. पण यासगळ्यात नेहमीप्रमाणे केआरकेच्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. स्वत:ला खूप मोठा समीक्षक मानणारा केआरके अर्थात कमाल आर खान ( Kamaal R Khan)याने ‘राधे’ पाहिल्यानंतरची त्याची पहिली प्रतिक्रिया ट्विट्वर नोंदवली. त्याची ही प्रतिक्रिया पाहून भाईजानलाही हसावे की रडावे, कळणार नाही.  (Radhe: Your Most Wanted Bhai review)

‘मी दुबईत सलमानचा राधे हा सिनेमा पाहिला. पण सध्या या सिनेमाचा रिव्ह्यू रेकॉर्ड करू शकेल, अशी माझी अवस्था नाही. मी औषध घेतो आणि 2-3 तास विश्रांती करतो. विश्रांती घेतल्यानंतर माझा मेंदू ठीक होईल आणि या सिनेमाचा रिव्ह्यू रेकॉर्ड करू शकेल, अशी आशा करतो,’ असे उपरोधिक ट्विट त्याने केले. इतकेच नाही यानंतर राधेच्या फर्स्ट हाफचा रिव्ह्यू देणारा एक व्हिडीओ त्याने शेअर केला आणि तो देताना ढसाढसा रडला.

अन् ढसाढसा रडला...

मित्रांनो, मी आत्ताच राधे या सिनेमाचा पहिला पार्ट बघितला. पण पहिला पार्ट बघितल्यानंतर माझे डोके फिरले आहे.  कशासाठी आणि का, याचा थांगपत्ताच नाही. आता मला सेकंड हाफ बघायचा आहे आणि माझी थिएटरमध्ये जाण्याची हिंमत होत नाहीये. मी सेकंड हाफ पाहिला तर मला वेड लागेल, असे केआरके व्हिडीओ म्हणतो अन् अचानक ढसाढसा रडू लागतो. मी सेकंड हाफ पाहिला नाही तर तुम्ही म्हणाल की मी सिनेमा न पाहताच रिव्ह्यू दिला. ठीक आहे. मी पाहतो. तुमच्यासाठी पाहतो. मग मला वेड लागलं तरी चालेल, असे तो पुढे म्हणतो.

‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या निमित्ताने  केआरकेने अक्षय कुमारवर निशाणा साधला होता. ‘देवी लक्ष्मी धन आणि सौभाग्यचे प्रतिक आहे. अक्षय कुमारने देवी लक्ष्मीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी प्रेक्षकांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा.  हा कॅनडा नाही भारत देश आहे. इथे देवी-देवतांची पुजा केली जाते. त्यांची चेष्ठा करत नाही,’ अशा आशयाचे ट्विट करुन त्याने ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घालण्याची मागणी केली होती.

टॅग्स :कमाल आर खानराधेसलमान खान