Join us  

‘राधे’ रिलीज झाला आणि पाठोपाठ #BoycottRadhe ट्रेंड झाला; वाचा काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 10:33 AM

Radhe Your Most Wanted Bhai : एकीकडे चाहत्यांच्या भाईजानच्या या सिनेमावर उड्या पडताहेत. दुसरीकडे ट्विटरवर ‘#BoycottRadhe’ हा हॅशटॅग चर्चेत आहे.

ठळक मुद्दे‘राधे’ या सिनेमावर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. समीक्षकांना सिनेमा फार भावला नाही. पण सलमानच्या चाहत्यांनी मात्र सिनेमा डोक्यावर घेतला आहे.

बॉलिवूड स्टार सलमान खानचा (Salman Khan) ‘राधे - योर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe Your Most Wanted Bhai) हा बहुप्रतिक्षीत सिनेमा रिलीज झालाये. अर्थात चित्रपटगृहांत नाही तर ओटीटीवर. एकीकडे भाईजानच्या चाहत्यांच्या या सिनेमावर उड्या पडताहेत. सोशल मीडियावर या सिनेमाबद्दलचे वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळताहेत. दुसरीकडे ट्विटरवर ‘#BoycottRadhe’ हा हॅशटॅगही चर्चेत आहे. होय, या हॅशटॅगअंतर्गत ‘राधे’वर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. आता ही मागणी कोण करतंय तर सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याचे फॅन्स बॉलिवूडच्या काही मोठ्या बॅनर्सवर व कलाकारांवर नाराज आहेत. सलमान यापैकीच एक स्टार आहे. दीर्घकाळानंतर सलमानचा सिनेमा रिलीज होताच, सुशांतच्या फॅन्सची नाराजी त्याला सहन करावी लागतेय. हे फॅन्स सलमानच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहे. #BoycottRadhe या हॅशटॅगसह सुशांतच्या फॅन्सनी अनेक पोस्ट केल्या आहेत आणि यानंतर हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करतोय.

एकीकडे बायकॉट, दुसरीकडे ऑनलाईन लीकसलमानच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत असताना दुसरीकडे भाईजानचे चाहते ‘राधे’ ऑनलाईन लीक झाला आहे. काल हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आणि यानंतर काहीच तासांत ऑनलाईन लीक झाला. भाईजानचे चाहते यामुळे संतापल्याचे चित्र आहे. अनेकांनी तर राधे लीक करणा-यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘राधे ऑनलाईन लीक झाला आहे. सलमान खान आणि झी स्टुडिओ तुम्ही काय करत आहात? लगेच अ‍ॅक्शन घ्या आणि राधेला वाचवा यार,’ असे एका चाहत्याने लिहिले आहे.‘राधे’ या सिनेमावर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. समीक्षकांना सिनेमा फार भावला नाही. पण सलमानच्या चाहत्यांनी मात्र सिनेमा डोक्यावर घेतला आहे. या सिनेमात सलमानसोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :राधेसलमान खानसुशांत सिंग रजपूत