बिग बॉसनंतर 'हा' टीव्ही शो होस्ट करणार सलमान खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 13:46 IST
बिग बॉस या रिअॅलिटी शोचे नाव आले की आपल्याला आठवतो तो भाईजान अर्थात सलमान खान. हा काही पहिला रिअॅलिटी ...
बिग बॉसनंतर 'हा' टीव्ही शो होस्ट करणार सलमान खान
बिग बॉस या रिअॅलिटी शोचे नाव आले की आपल्याला आठवतो तो भाईजान अर्थात सलमान खान. हा काही पहिला रिअॅलिटी शो नाही आहे ज्याचे सलमानने सूत्रसंचालन केला आहे. याआधी ही एका टेलीव्हिजन शोचे सूत्रसंचालन सलमान खानने केले होते. खूप कमी लोकांना माहिती आहे सलमान खानने छोट्या पडद्यावर 'दस का दम' या रिअॅलिटी शोचे पहिल्यांदा सूत्रसंचालन केले होते.मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान खान पुन्हा एकदा दस का दम या शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आठ वर्षापूर्वी याच शोच्या माध्यमातून सलमान खानने सूत्रसंचालक म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार या शोच्या तिसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन करण्यास सलमान तयार झाला आहे. या शोबाबत चॅनेल आणि सलमानमध्ये बोलणी झाली आहे. दस का दम हा शो जुलैमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे बोलले जाते आहे. याआधीही हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तसेच सलमान खानचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना भावले होते. सध्या कपिला शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यामध्ये झालेल्या भांडणामुळे द कपिल शर्मा शोची टीआरपी दिवसांदिवस कमी होते आहे. याला घेऊन चॅनेलची मंडळी चिंतेत आहे त्यामुळे सलमान खानचा शो चॅनलसाठी संजवीनी ठरु शकतो. सलमान खानने होस्ट केलेले बिग बॉसचे सगळे सीझन हिट गेले आहेत. सलमानची आपलीच एक वेगळी सूत्रसंचालनाची स्टाइल आहे. जी त्याच्या चाहत्यांना खूपच आवडते.