Join us  

बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत लव यात्रीच्या टीमला सलमान खानने दिला हा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 5:17 PM

सलमान खानचे चित्रपट म्हटले की, त्याचे चित्रपट 100 कोटीहून अधिक गल्ला जमवणार यात काही शंकाच नसते. गेल्या दहा वर्षांपासून त्याचे सगळेच चित्रपट 100 कोटींहून अधिक व्यवसाय करत आहेत. त्याच्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रेस 3 या चित्रपटाने 100 हून अधिक कोटींचा गल्ला जमवला होता. पण तरीही या चित्रपटाची गणना फ्लॉप चित्रपटात करण्यात आली होती.

सलमान खानच्या बॅनर अंतर्गत तो त्याचा मेहुणा आयुष शर्माला लाँच करत आहे. आयुष हा सलमानची लाडकी बहीण अर्पिताचा नवरा आहे. लव्ह यात्री असे आयुषच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात वरीना हुसेन ही नायिका आहे. वरीनाचा देखील हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमानने वांद्रे येथील त्याच्या निवास स्थानी नुकताच पत्रकारांसोबत संवाद साधला.

सलमान खानचे चित्रपट म्हटले की, त्याचे चित्रपट 100 कोटीहून अधिक गल्ला जमवणार यात काही शंकाच नसते. गेल्या दहा वर्षांपासून त्याचे सगळेच चित्रपट 100 कोटींहून अधिक व्यवसाय करत आहेत. त्याच्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रेस 3 या चित्रपटाने 100 हून अधिक कोटींचा गल्ला जमवला होता. पण तरीही या चित्रपटाची गणना फ्लॉप चित्रपटात करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर 100 कोटी क्लब मधला त्याचा जय हो देखील फ्लॉप मानला जातो. यावरूनच सलमानने लव्ह यात्री या त्याच्या चित्रपटाच्या टीमला एक सल्ला दिला आहे. सलमान सांगतो, मी आयुष आणि वरीनाला सांगितले आहे की, 100 कोटी कमवूनही माझे चित्रपट फ्लॉप ठरवले जातात. त्यामुळे अशाच प्रकारे तुमचा चित्रपट प्लॉप ठरला तरी चालेल... पण चित्रपटाने 170 कोटी तरी कमावले पाहिजे. त्यामुळे आता त्या दोघांवर फ्लॉप चित्रपट देण्याचे दडपण आले आहे. 

सलमान खान प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या लव यात्री या सिनेमाचे दिग्दर्शन अभिराज मीनावालाने केले आहे. अभिराजची देखील दिग्दर्शन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला लव यात्री एक रोमॅन्टिक चित्रपट असून या चित्रपटात आयुष गरबा शिकवणाऱ्या मुलाची भूमिका साकारत आहे तर वरिना एक फॉरेनर असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नाव सुरुवातीला लव रात्री असे ठेवण्यात आले होते. पण या नावामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने या चित्रपटाचे नाव बदलून लव यात्री असे ठेवण्यात आले आहे.  

टॅग्स :सलमान खानलवरात्रिआयुष शर्मावरिना हुसैन