Join us  

KRKने घेतला ‘राधे’शी पंगा, भाईजानने ठोकला मानहानीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 11:06 AM

 केआरकेने  ‘राधे’वर अशी काही टीका केली की भाईजान भडकला आणि त्याने केआरकेविरोधात मानहानीचा दावा ठोकला. 

ठळक मुद्देकेआरकेने त्याच्या ट्विटर व युट्यूब हँडलवर ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’चा रिव्ह्यू दिला होता.

भाईजान सलमान खानशी (Salman Khan ) पंगा घेणे एका अभिनेत्याला चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. होय, हा अभिनेता कोण तर केआरके अर्थात कमाल आर खान. ( kamaal r khan ) केआरकेने  ‘राधे’वर अशी काही टीका केली की भाईजान भडकला आणि त्याने केआरकेविरोधात मानहानीचा दावा ठोकला. या कारवाईनंतर केआरकेने अनेक ट्विट केले आहेत. जे सध्या तुफान व्हायरल होत आहेत. (Salman Khan files defamation case against KRK )मुंबईच्या एका कोर्टात केआरकेविरोधात दावा दाखल केला आहे. लवकरात लवकर यावर सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. केआरकेवर ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाची प्रतीमा मलीन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

केआरकेने त्याच्या ट्विटर व युट्यूब हँडलवर ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’चा रिव्ह्यू दिला होता. राधेचा पहिला पार्ट पाहून माझ्या मेंदूचा पार भुगा झाला. दुसरा पार्ट पाहण्याची माझी हिंमत होत नाहीये. दुसरा पार्ट पाहिला तर मला वेड लागेल, असे म्हणत केआरके रिव्ह्यू व्हिडीओमध्ये चक्क रडला होता.

केआरकेचे ट्विट

सलमानच्या या कारवाईनंतर केआरकेने अनेक ट्विट केलेत. ‘प्रिय सलमान, हा मानहानीचा दावा तुझ्या नैराश्याचा पुरावा आहे. मी माझ्या फॉलोअर्ससाठी रिव्ह्यू देतोय आणि माझे काम करतो. मला रिव्ह्यू देण्यापासून रोखण्याऐवजी तुला चांगले सिनेमे बनवायला हवे. मी सत्यासाठी ही लढाई नक्की लढेन. केससाठी धन्यवाद,’ असे पहिले ट्विट केआरकेने केले आहे.

 दुस-या ट्विटमध्ये त्याने लिहिले, ‘ सलमान खानने मी राधेचा रिव्ह्यू केल्यामुळे माझ्यावर मानहानीचा दावा ठोकला. याचा अर्थ स्पष्ट आहे, माझ्या रिव्ह्यूमुळे तो दुखावला आहे. यामुळे मी आता त्याच्या कोणत्याही सिनेमाचा रिव्ह्यू करणार नाही.’

टॅग्स :कमाल आर खानसलमान खान