Join us  

मला अनफॉलो करा, पण सलमानला काही बोलू नका...!  कश्मीरा शाह ‘भाईजान’वर फिदा

By रूपाली मुधोळकर | Published: October 15, 2020 3:59 PM

म्हणे, सलमान इंडस्ट्रीतला सर्वात चांगला माणूस...

ठळक मुद्देकश्मीरा आणि कृष्णा यांनी 2013मध्ये लग्न केले. काही कॉमन फ्रेंड्समुळे त्या दोघांची ओळख झाली होती.

अभिनेता व कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी व अभिनेत्री कश्मीरा शाह सलमान खानबद्दल जे काही बोलली त्यानंतर तुम्ही तिच्या हिमतीची दाद घ्याल. होय, हवं तर मला अनफॉलो करा, पण सलमानवर टीका करू नका, असे कश्मीराने म्हटले आहे. कारण काय तर मृत्यूशी झुंज  देत असलेल्या फराज खानला सलमानने केलेली मदत. या मदतीसाठी कश्मीराने सलमानचे मनापासून आभार मानलेत. शिवाय एक पोस्ट लिहित, सलमान किती सच्चा आहे, याचे गोडवेही गायले.

‘मेहंदी’ फेम अभिनेता फराज खान सध्या रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला तिस-या स्टेजच्या कॅन्सरचे निदान झाले आहे. आर्थिक संकटाशी सामना करत असलेल्या फराजकडे उपचारासाठीही पैसे नाहीत. पूजा भटने त्याच्या मदतीसाठी बॉलिवूडकरांना आवाहन केले होते. अशात भाईजान फराजच्या मदतीसाठी धावून आला. त्याच्या सगळ्या उपचाराचा खर्च त्याने उचलला. स्वत: कश्मीरा शाहने याची माहिती दिली होती. सोबत सलमानसाठी खास पोस्टही शेअर केली.

‘तू खरंच ग्रेट ह्युमन बीईंग (चांगला माणूस)आहेस. फराजसाठी तू जे काही केलेस, त्यासाठी तुझे आभार. मी तुझी खरी चाहती आहे. अनेक लोक तुझ्यावर टीका करतात. या पोस्टवरही ते टीका करतील. पण या टीकेने मला फरक पडत नाही. टीकाकारांनो हवे तर मला अनफॉलो करा. तो पर्याय नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. पण माझ्या मते, ज्याला मी आजपर्यंत भेटले, तो सलमान इंडस्ट्रीतील सर्वात चांगला माणूस आहे,’ असे कश्मीरा म्हणाली.

कश्मीरादेखील एक  अभिनेत्री आहे.  यस बॉस, प्यार तो होना ही था, वेकअप सिड, कही प्यार न हो जाये यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच ती बिग बॉसमध्ये देखील झळकली होती. कश्मीरा आणि कृष्णा यांनी 2013मध्ये लग्न केले. काही कॉमन फ्रेंड्समुळे त्या दोघांची ओळख झाली होती. कश्मीराचे हे दुसरे लग्न असून तिचे पहिले लग्न एका उद्योगपतीसोबत झाले होते. 

क्या बात! 'या' अभिनेत्याच्या मदतीसाठी धावून आला सलमान, 'इतक्या' लाखांची हॉस्पिटलची बिलं केली पे!

रानी मुखर्जीच्या हिरोजवळ उपचारासाठी नाहीत पैसे, पूजा भट्टने चाहत्यांसमोर पसरले हात

टॅग्स :सलमान खानकृष्णा अभिषेक