Join us  

अरिजीत सिंग आणि सलमान खानमधील ९ वर्षांपूर्वीचं भांडण मिटलं?, हा व्हिडीओ आहे त्याचा पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 11:31 AM

सलमान खान आणि अरिजीत सिंग यांच्यात अनेक वर्षांपासून वाद आहे.

सलमान खान आणि अरिजीत सिंग यांच्यात अनेक वर्षांपासून वाद आहे. एका कार्यक्रमादरम्यान दोन्ही स्टार्समध्ये मतभेद झाले, त्यानंतर दोघांनी एकत्र काम केले नाही. सलमान खानच्या चित्रपटात अरिजित सिंगचेही एक गाणे होते, जे त्याने काढून टाकल्याचे सांगितले जाते. मात्र आता हे दोघेही आपापसातील मतभेद विसरल्याचे दिसून येत आहे. अरिजीत सिंग मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडताना दिसला. त्यामुळे आता या दोघांमधील जुने भांडण संपले असा अंदाज बांधला जातोय. असेही मानले जाते की लवकरच हा अरिजीत सलमान खानच्या चित्रपटातील गाण्याला आपला आवाज देऊ शकतो.

गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडताना अरिजीत सिंगचा व्हिडिओ सलमान खानच्या एका चाहत्याने एक्स (ट्विटर) वर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये लिहिले - 'अरिजित सिंग आज सलमान खानच्या घरी स्पॉट झाला. हे काय चालले आहे? #Tiger3, #Tiger3Trailer.' आणखी एका चाहत्याचा असा अंदाज आहे की दोन स्टार्सची ही भेट सलमान खानच्या आगामी 'टायगर 3' चित्रपटाशी संबंधित असू शकते. 

 

कशावरुन झाला होता वाद?सलमान व अरिजीत सिंगमध्ये  2014मध्ये भांडण सुरू झालं. एका पुरस्कार सोहळ्यात अरिजीतला सर्वोत्कृष्ठ गायकाचा पुरस्कार मिळाला होता. अरिजीत पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आला तेव्हा सूत्रसंचालन करणाऱ्या सलमानने अरिजीतबरोबर मस्करी केली. झोपला होतास? असा प्रश्न सलमानने विचारला. त्या प्रश्नाला अरिजीतने उत्तर दिलं. सलमानच्या होस्टिंग स्टाइलला उद्देशून अरिजीत म्हणाला, तुम्ही  झोपण्यास भाग पाडलं. सलमानने नंतर अरिजीतच्या 'तुम ही हो', गाण्याला टार्गेट केलं. अशी गाणी वाजली तर झोप येणारच, असं सलमान खान म्हणाला होता. 

यावर अरिजीत काहीही न बोलता स्टेजवरून निघून गेला. यानंतर सलमान खानने त्याच्या किक, बजरंगी भाईजान आणि सुलतान यांसारख्या चित्रपटांमधून अरिजातची गाणी काढून टाकली. मात्र, 2016 मध्ये अरिजीतने जाहीरपणे माफी मागितली होती. 

टॅग्स :सलमान खानअरिजीत सिंह