Join us  

'पुष्पा' फेम रश्मिका मंदानासोबत सामी सामी गाण्यावर थिरकला सलमान खान, व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 4:42 PM

Rashmika Mandanna And Salman Khan : लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या हस्ते रश्मिका मंदानाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ग्लॅमर, उद्योग अन् फॅशनच्या जगतातील काही स्टायलिश व्यक्तिमत्त्वांना काल लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बुधवारी (दि.२८) मोठ्या दिमाखात पार पडलेल्या सोहळ्यात केवळ मान्यवरांच्या ‘स्टाइल’विषयीच नव्हे, तर त्यांच्या यशाचाही गौरव करण्यात आला. या सोहळ्याला बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतातील कलाकारांनी हजेरी लावली होती आणि या तारकांनी भरलेल्या संध्याकाळी रेड कार्पेटवर अनेक स्टार्सनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. पण चाहत्यांना या कार्यक्रमाची खरी मजा आली जेव्हा सलमान खान स्टेजवर आला. मनीष पॉल हा शो होस्ट करत होता. इतकंच नाही तर पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत सामी सामी या गाण्यावर सलमाननेही ताल धरला. सध्या त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या हस्ते रश्मिका मंदानाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर पुष्पा चित्रपटातील सामी सामी गाण्यावर रश्मिका मंदानासोबत सलमान खान आणि मनीष पॉलनेदेखील डान्स केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.पुष्पा द राइज या चित्रपटातील सामी सामी हे गाणे या वर्षीच्या चार्टबस्टर्सपैकी एक आहे. तेलुगूमध्ये हे गाणे जितके लोकप्रिय झाले तितकेच त्याचे हिंदी व्हर्जनही हिट ठरले आहे. सुनिधी चौहानने या गाण्याला हिंदीत स्वरसाज दिला आहे.

यंदा लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर सलमान, रश्मिकासोबत विद्या बालन, हिना खान, नुशरत भरुचा, अनन्या पांडे, रितेश देशमुख, जिनेलिया डिसुझा, मनीष पॉल, जॅकी श्रॉफ, पलक तिवारी, तमन्ना भाटिया, मधुर भांडारकर या कलाकारांनी हजेरी लावली होती.
टॅग्स :सलमान खानरश्मिका मंदानालोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस