Join us  

Video Viral : सायकलवर सल्लूला पाहून चाहत्यांना लागलं याडं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 11:51 AM

भाईजान सलमान खानची बातचं न्यारी. सध्या सल्लू मध्यप्रदेशातील मंडलेश्वर येथे ‘दबंग 3’चे शूटींग करतोय. साहजिकचं मंडलेश्वर येथील चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

ठळक मुद्दे ‘भारत’ हातावेगळा केल्यावर सलमानने ‘दबंग 3’चे शूटींग सुरु केले. ‘दबंग 3’ पूर्ण होताच सलमान ‘इंशाअल्लाह’ या संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात बिझी होणार आहे.

भाईजान सलमान खानची बातचं न्यारी. सध्या सल्लू मध्यप्रदेशातील मंडलेश्वर येथे ‘दबंग 3’चे शूटींग करतोय. साहजिकचं मंडलेश्वर येथील चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. ‘दबंग 3’च्या सेटवरचे फोटो व्हायरल करण्यापासून तर सल्लूच्या पाठीमागे धावत सुटण्यापर्यंतचे ना-ना करामती करण्यात चाहते बिझी आहेत. विश्वास बसत नसेल तर हा ताजा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा. सलमान सायकल घेऊन रस्त्यांवर फिरतोय आणि त्याच्यामागे चाहत्यांची अख्खी फौज त्याच्यामागे धावत सुटलीय, असा हा व्हिडीओ सध्या जाम चर्चेत आहे. कुणी त्याचा फोटो कॅमेºयात कैद करण्याचा प्रयत्न करतोय तर कुणी नुसतेच त्याच्या पाठीशी धावत आहेत. 

‘दबंग 3’ या चित्रपटात ‘चुलबुल पांडे’च्या बालपणीचे किस्से पाहायला मिळणार आहेत. सूत्रांचे मानाल तर, मध्यप्रदेशात सर्वप्रथम ‘दबंग 3’च्या टायटल सॉन्गचे शूटींग होणार आहे. यात चुलबुल पांडे ५०० कलाकारांसोबत या गाण्याचे शूट करेल. यानंतर चुलबूल पांडेचा एक बाईकवरचा अ‍ॅक्शन सीनही येथेच शूट होणार आहे. या चित्रपटात चुलबुल पांडे बनलेला सलमान दोन एकदम वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार असल्याचे कळतेय.

 सुप्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभु देवा हा चित्रपट दिग्दर्शित करतोय.  ‘दबंग 3’ या चित्रपटात सलमानच्या अपोझिट  सोनाक्षी सिन्हाची वर्णी लागली आहे.  सोनाक्षीसोबतच महेश मांजरेकरची मुलगी अश्वनी मांजरेकर ही सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटातील उर्वरित कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. लवकरच सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘भारत’ हातावेगळा केल्यावर सलमानने ‘दबंग 3’चे शूटींग सुरु केले. ‘दबंग 3’ पूर्ण होताच सलमान ‘इंशाअल्लाह’ या संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात बिझी होणार आहे.

टॅग्स :सलमान खानदबंग 3