Join us  

OMG ! शूटींग सुरु होत नाही तोच लीक झाली सलमान खानच्या ‘दबंग 3’ची कथा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 10:00 AM

‘दबंग 3’बद्दल एक ताजी बातमी आहे. ही बातमी वाचून ‘दबंग 3’ची प्रतीक्षा करणारे चाहते काहीसे निराश होऊ शकतात. होय, ‘दबंग 3’चे शूटींग सुरु होत नाही तोच या चित्रपटाची कथा लीक झाली आहे.

ठळक मुद्दे‘दबंग 3’ या चित्रपटात सलमानच्या अपोझिट पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हाची वर्णी लागली आहे.  

दबंग 3’ हा सलमान खानचा आगामी सिनेमा सध्या जाम चर्चेत आहेत. मध्यप्रदेशात चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सलमान, सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, प्रभुदेवा असे सगळे येथे तळ ठोकून आहेत. तूर्तास ‘दबंग 3’बद्दल एक ताजी बातमी आहे. ही बातमी वाचून ‘दबंग 3’ची प्रतीक्षा करणारे चाहते काहीसे निराश होऊ शकतात. होय, ‘दबंग 3’चे शूटींग सुरु होत नाही तोच या चित्रपटाची कथा लीक झाली आहे.

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात सलमान खान शेतकºयांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात लढताना दिसेल. काही दिवसांपूर्वी बळजबरीने गरीब शेतकºयांच्या जमिनी लाटणाºया भू-माफियांबद्दलच्या बातम्या चर्चेत होत्या. सलमानचा ‘दबंग 3’ ही कहाणी पडद्यावर दाखवणार आहे. राजकीय शह मिळालेल्या भू माफियांविरोधात लढून चुलबुल पांडे  गरीब शेतक-यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देईल.

ही कथा मजेदार दिसतेय आणि सलमान या कथेला पूर्णपणे न्याय देईल, असा चाहत्यांना विश्वास आहे. अर्थात ही कहाणी लीक न होता थेट पडद्यावर पाहायला मिळाली असती तर त्याची मजा काही वेगळीच असती.‘दबंग 3’ प्रभु देवा दिग्दर्शित करतोय. यापूर्वी सलमान व प्रभु देवा या जोडीने ‘वॉन्टेड’ या चित्रपटात सोबत काम केले होते. आता १० वर्षांनंतर पुन्हा ही जोडी ‘दबंग 3’ हा चित्रपट घेऊन येतेय.  साऊथ अभिनेता सुदीप यात खलनायक साकारताना दिसणार आहे. ‘दबंग 3’ या चित्रपटात सलमानच्या अपोझिट पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हाची वर्णी लागली आहे.  सोनाक्षीसोबतच महेश मांजरेकरची मुलगी अश्वनी मांजरेकर ही सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. 

टॅग्स :सलमान खानदबंग 3सोनाक्षी सिन्हाप्रभू देवा