Join us

Salman Khan and Sharukh Khan at Big Boss sets

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 10:43 IST

सलमान खान आणि शाहरुख खान बिग बॉसच्या सेटवर एकत्र आले. रईसच्या प्रमोशनसाठी शाहरुख सलमानच्या बिग बॉसच्या सेटवर एकत्र आला होता. शाहरुख स्टेजवर येताच सलमानने त्याला मिठी मारत स्वागत केले.

सलमान खान आणि शाहरुख खान बिग बॉसच्या सेटवर एकत्र आले. रईसच्या प्रमोशनसाठी शाहरुख सलमानच्या बिग बॉसच्या सेटवर एकत्र आला होता. शाहरुख स्टेजवर येताच सलमानने त्याला मिठी मारत स्वागत केले. 'तुम्हारे करन-अर्जुन वापस आयेगा' असे सलमानने शाहरुख स्टेजवर येताच म्हटले.गेल्या काही दिवसात सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील मैत्रीचे नाते अधिक घट्ट होताना दिसतेय. याचीच प्रचिती प्रेक्षकांना बिग बॉसच्या सेटवर आली.यावेळी दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसले.कबीर खानच्या आगामी ट्युबलाईट चित्रपटात सलमान आणि शाहरुख आपल्याला एकत्र दिसणार आहेत. ट्युबलाईट चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यानचा सलमान आणि शाहरुखचा फोटो सोशलमीडियावर व्हायरल झाला होता.शाहरुख आणि सलमानच्या केमिस्ट्री प्रेक्षकांना बिग बॉसच्या सेटवर दिसली. तर सनी लिओनी ही यावेळी याठिकाणी रईसच्या प्रमोशनसाठी आली होती.