Join us  

कन्फ्युजन दूर! या ‘क्लासिक’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार ‘करण-अर्जुन’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 11:57 AM

संजय लीला भन्साळींनी आपल्या आगामी चित्रपटासाठी सलमान खानला साईन केलेय, हे तुम्हाला ठाऊक आहेच. तूर्तास भन्साळी व सलमानच्या या चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. साहजिकच चाहते कन्फ्युज आहेत.

ठळक मुद्देसलमान आणि शाहरुख यांनी २००२ मध्ये ‘हम तुम्हारे हैं सनम’ या सिनेमात एकत्र काम केले होते.

संजय लीला भन्साळींनी आपल्या आगामी चित्रपटासाठी सलमान खानला साईन केलेय, हे तुम्हाला ठाऊक आहेच. तूर्तास भन्साळी व सलमानच्या या चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. काहींच्या मते, भन्साळी व सलमानचा हा चित्रपट एक लव्हस्टोरी आहे. तर काहींच्या मते, या चित्रपटात सलमान व शाहरुख ही जोडी एकत्र दिसणार आहे. साहजिकच चाहते कन्फ्युज आहेत. पण आता हे कन्फ्युजन दूर करणारी बातमी आहे. होय, ताजी बातमी खरी मानाल तर संजय लीला भन्साळी सध्या एक नाही, दोन नाही तर तीन-तीन प्रोजेक्टवर काम करत आहेत. पहिल्या चित्रपटात ते सलमान खानसोबत काम करणार आहेत आणि या चित्रपटात एक अनोखी लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. भन्साळींचा दुसरा चित्रपट आहे, ‘गंगुबाई’. तिसरा चित्रपट सर्वात खास आहे. होय, सूत्रांचे मानाल तर १९५२ मध्ये रिलीज झालेला मीना कुमारी स्टारर कल्ट क्लासिक ‘बैजू बावरा’ या चित्रपटाच्या रिमेकवरही भन्साळींचे काम सुरु आहे. 

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, भन्साळींनी या रिमेकसाठी ‘बैजनाथ’, ‘बैजू’ व ‘बैजू तानसेन’ असे तीन टायटल रजिस्टर केले आहेत. याच रिमेकमध्ये सलमान व शाहरूख दिसणार, अशीही बातमी आहे. आहे ना खास?

 काही दिवसापूर्वी भन्साळीच्या वाढदिवसाच्या पार्टीत सलमानने हजेरी लावली होती. या पार्टीला शाहरुखही आला होता. तेव्हापासून शाहरुख आणि सलमान भन्साळीच्या आगामी चित्रपटात एकत्र काम करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सलमान आणि शाहरुख यांनी २००२ मध्ये ‘हम तुम्हारे हैं सनम’ या सिनेमात एकत्र काम केले होते. आता ही जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसल्यास त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. 

टॅग्स :सलमान खानशाहरुख खानसंजय लीला भन्साळी