Join us  

सलमान खान आणि कतरिना कैफ पुन्हा धमाका करण्यासाठी सज्ज, झळकणार या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 10:19 AM

सलमान खान आणि कतरिना कैफच्या चाहत्यांसाठी खुशखूबर. ही जोडी लवकरच येणार भेटीला.

बॉलिवूडमध्ये सध्या कित्येक मोठ्या बॅनरच्या चित्रपटांची चर्चा ऐकायला मिळते आहे. कित्येक सिनेमांचे तर शूटिंग चालू आहे तर काहींची रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे. यादरम्यान आता सलमान खान आणि कतरिना कैफच्या चाहत्यांसाठी खुशखूबर आहे. ती म्हणजे सलमान खान आणि कतरिना कैफ या जोडीच्या सुपरहिट फ्रेंचाइजीच्या तिसऱ्या चित्रपटाच्या तयारीची डिटेल्स समोर आली आहे. हा चित्रपट म्हणजे टायगर ३. या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. 

सलमान खान आणि कतरिना कैफ या जोडीचा टायगर ३ हा नववा चित्रपट असेल. ईटाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, टायगर ३चे काम सुरू झाले असून शूटिंगची तारीखही समोर आली आहे.

ईटाइम्सनुसार, सलमान आणि कतरिना मार्च २०२१ पासून 'टायगर ३'च्या शूटिंगला सुरूवात करणार आहेत. यासोबतच या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे चित्रीकरण मुंबईत होणार असल्याचेही सांगितले जात आहे. तर यानंतरचं उर्वरित शूटिंग मध्य पूर्व देशात केले जाणार आहे. एवढेच नाही तर या आगामी चित्रपटात तुम्हाला शाहरूख खान देखील दिसणार आहे. चित्रपटातील एका खास सीनमध्ये शाहरुख खानही दिसणार आहे

टायगर फ्रेंचायझीच्या या चित्रपटाचे बजेटही खूप जास्त असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे बजेट 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन्ही चित्रपटांपेक्षा खूप जास्त असेल. दरम्यान या चित्रपटाचे नाव तेच ठेवले जाईल की नाही, यावर सध्या चर्चा सुरू आहे. कदाचित या चित्रपटाचे नावही बदलले जाऊ शकते. याशिवाय यश राज फिल्म या चित्रपटातील व्हिलनसाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे.

टॅग्स :कतरिना कैफसलमान खान