सलमान खान- अक्षय कुमारला पछाडत शाहरूख कमाईत अव्वल! वाचा, किती आहे शाहरूखची कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 12:14 IST
अभिनेत्रीनंतर फोर्ब्स मॅगझिनने जगातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांची यादी जारी केली आहे. जगभरातील हॉलिवूडच्या दिग्गज स्टार्सने सजलेल्या या यादीत ...
सलमान खान- अक्षय कुमारला पछाडत शाहरूख कमाईत अव्वल! वाचा, किती आहे शाहरूखची कमाई!
अभिनेत्रीनंतर फोर्ब्स मॅगझिनने जगातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांची यादी जारी केली आहे. जगभरातील हॉलिवूडच्या दिग्गज स्टार्सने सजलेल्या या यादीत बॉलिवूडच्याही तीन अभिनेत्यांचे नाव आहे. होय, बॉलिवूडच्या तीन खानांपैकी दोघांनी या यादीत स्थान मिळवले आहेत. ही दोन नावे म्हणजे, बॉलिवूडचा ‘किंगखान’ शाहरूख खान आणि ‘दबंग खान’ सलमान खान. (अर्थात गतवर्षी ‘दंगल’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा देणा-या आमिर खानचे नाव या यादीत नाही.) फोर्ब्सच्या या यादीतील तिसरा बॉलिवूड अभिनेता आहे, अक्षय कुमार.यंदा ‘रईस’ आणि ‘जब हॅरी मेट सेजल’ हे दोन चित्रपट घेऊन येणा-या शाहरूखने या यादीत आठवे स्थान मिळवले आहे. यापाठोपाठ सलमानचा क्रमांक आहे. त्याने या यादीत ९ वे स्थान मिळवले आहे. याऊलट ‘जॉली एलएलबी2’ आणि ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ सारखे हिट चित्रपट देणारा अक्षय कुमार याने या यादीत १० वा क्रमांक मिळवला आहे. ALSO READ : OMG!! शाहरूख खानचे ‘स्टारडम’ धोक्यात तर नाही?फोर्ब्सच्या या यादीत सलमान, अक्षय यांना पछाडणाºया शाहरूखची कमाई २ अब्ज ४३ कोटी रुपए असल्याचे यात म्हटले आहेत. याऊलट सलमानची २ अब्ज ३७ कोटी तर अक्षयची २ अब्ज २७ कोटीच्या घरात असल्याचे या यादीत म्हटले आहे. बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याच्याबद्दल बोलायचे तर आमिर फार कमी जाहिरातीत दिसतो. शिवाय वर्षांतून केवळ एक सिनेमा करतो. त्यामुळे तो या यादीत नसणे स्वाभाविक आहे.अलीकडे फोर्ब्सने जगभरातील सर्वाधिक कमाई करणाºया अभिनेत्रींची यादी जाहिर केली होती. यात बॉलिवूडच्या एकाही अभिनेत्रीचे नाव नव्हते. गतवर्षी या लिस्टमध्ये दीपिका पादुकोणने १० वे स्थान मिळवले होते. फोर्ब्सच्या या यादीत हॉलिवूड अभिनेता मार्क वाह्ल्बर्ग याने पहिले स्थान मिळवले. तर ड्वेन डगलस जॉनसन दुसºया तर विन डिजलने तिसरे स्थान पटकावले आहे.