‘पार्टनर 2’मध्ये दिसणार सलमान-गोविंदाची जोडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 22:00 IST
बॉलिवूडचा दंबग स्टार सलमान खान व गोविंदा पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलमान व गोविंदाचा सुपरहिट ...
‘पार्टनर 2’मध्ये दिसणार सलमान-गोविंदाची जोडी!
बॉलिवूडचा दंबग स्टार सलमान खान व गोविंदा पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलमान व गोविंदाचा सुपरहिट चित्रपट ‘पार्टनर’च्या सिक्वलची तयारी सुरू झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यात सलमान व गोविंदा यांच्या भूमिका कायम ठेवण्यात आल्या आहेत. 2007 साली डेव्हिड धवन यांनी ‘पार्टनर’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. सलमान खान व गोविंदा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरला होता. गोविंदा व सलमान एकत्र आल्यास दोघांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. यापूर्वी 2011 मध्ये देखील पार्टनरचा सिक्वलच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र चर्चे व्यतिरिक्त काहीच झाले नाही. सध्या डेव्हिड धवन सलमान खानची दुहेरी भूमिका असलेला सुपरहिट ‘जुडवा’ या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये बिझी आहेत. यात वरुण धवनची दुहेरी भूमिका आहेत. वरुण धवन यासाठी चांगलीच मेहनत घेत असल्याचे कळतेय. नुकतीच वरुणने त्याच्या आगामी ‘ब्रद्रिनाथ की दुल्हनीया’ या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग शूट केला आहे. डेव्हिड धवन आपल्या मागील सुपरहिट चित्रपटांवर काम करण्याचा विचार करीत असल्याचे सांगण्यात येते. यातील जुडवा हा एक भाग असल्याचे मानले जात आहे. पार्टनरसाठी सलमान व गोविंदा तयार झाल्यास या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद-फरहाद करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलमान व गोविंदा यांच्यात काही दिवसांपूर्वी बिनसल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आता ही गोष्ट बरीच जुणी झाली असून यात त्यांचे संबध पूर्ववत झाल्याचे सांगण्यात येते. सलमान व गोविंदा यांनी दिवाना-मस्ताना, मिस्टर अँड मिसेस खन्ना या चित्रपटात भूमिका के ल्या आहेत.