Join us

सल्लू मियाँची बिग बर्थडे बॅश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 15:12 IST

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान ज्याची एक झलक मिळावी म्हणून चाहते तळमळत असतात. असा भाईजान आता आयुष्याच्या उत्तरार्धात प्रवेश करतोय. ...

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान ज्याची एक झलक मिळावी म्हणून चाहते तळमळत असतात. असा भाईजान आता आयुष्याच्या उत्तरार्धात प्रवेश करतोय. यंदाचा त्याचा वाढदिवस खुप स्पेशल असणार यात काही शंका नाही.बरं.. आता स्पेशल असण्याची कारण काय? म्हणून विचार केला तर कळेल की, २00२ मध्ये 'हिट अँण्ड रन केस' मधून त्याची कायदेशीररित्या सुटका झाली. तसेच त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतुर हिची घरच्या सर्व कु टुंबियांशी ऑफीशियली ओळख करून देणार आहे.यात आणखी काय नवीन म्हटलं तर? त्याची बर्थडे पार्टी पनवेल येथील फार्महाऊसवर होणार असून बॉलीवूडचे बिग्गिज सोहळ्याला उपस्थित असतील, अशी माहिती मिळाली आहे.शाहरूख खानही या सोहळ्यात विशेष आकर्षण असेल. या बॅशमध्ये ग्रेट म्युजिक बाय ग्रेट म्युजिशियन्स असेल. बेल्जियन डीजे दिमित्री वेगास, माईक आणि डेव्हिड गुटा हे विशेष आकर्षण असतील. बाय द वे.सल्लू वी रिअली विश यू हॅप्पी बर्थ डे इन अँडव्हान्स..!