सैफ मला म्हणतो,‘बेबे...’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 23:06 IST
नवाब आॅफ पतौडी आणि बेगम आॅफ पतौडी म्हणजेच सैफ अली खान-करिना कपूर खान. यांची जोडी बॉलीवूडमध्ये सर्वांत हॉट कपलपैकी ...
सैफ मला म्हणतो,‘बेबे...’
नवाब आॅफ पतौडी आणि बेगम आॅफ पतौडी म्हणजेच सैफ अली खान-करिना कपूर खान. यांची जोडी बॉलीवूडमध्ये सर्वांत हॉट कपलपैकी एक समजली जाते. लव्हिंग कपल म्हणून ते ओळखले जातात.सैफ सध्या ‘रंगून’ चित्रपटासाठी शूटिंग करत असून करिना ‘उडता पंजाब’ आणि ‘की अॅण्ड का’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्या दोघांचे जेव्हा लग्न झाले त्यानंतर त्यांच्यातील सेल्फीज, आऊटींग, एकमेकांबद्दलच्या शेअरींग ते सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतात. आता नुकतेच करिनाने पती सैफ अली खान तिला खाजगीत काय म्हणतो ? ते सांगितले आहे.वेल, आता आपल्याला तर माहित आहे की, सगळं जग तिला ‘बेबो’ या नावाने ओळखतं. पण तिचा डिअर पती तिला काय म्हणतो हे जास्त महत्त्वाचं नाही का? तर ती म्हणते,‘ संपूर्ण जग मला ‘बेबो’ या नावाने ओळखतं, पण सैफ मला ‘बेबे’ नावाने बोलावतो.’