Join us  

'तानाजी'मध्ये सैफ अली खान साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 12:04 PM

अभिनेता अजय देवगणने नुकतेच आगामी चित्रपट 'तानाजी : द अनसंग वॉरियर'चे शूटिंग सुरु केले आहे. आता या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानची देखील वर्णी लागल्याचे समजते आहे.

ठळक मुद्देअजय देवगण दिसणार तानाजीच्या भूमिकेत'तानाजी' चित्रपटात सैफ दिसू शकतो शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

अभिनेता अजय देवगणने नुकतेच आगामी चित्रपट 'तानाजी : द अनसंग वॉरियर'चे शूटिंग सुरु केले आहे. आता या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानची देखील वर्णी लागल्याचे समजते आहे. या ऐतिहासिक सिनेमात सैफ कोणती भूमिका साकारणार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. सैफ या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. 

सैफ अली खानने दोन हिरो असलेल्या सिनेमात काम करणे थांबवले आहे. मात्र सध्या त्याच्या करिअरचा बॅड पॅच सुरू आहे. त्यामुळे अजय देवगण प्रोडक्‍शनच्या तानाजीमध्ये काम करण्यास त्याच्याकडून होकार दिला जाण्याची शक्‍यता आहे. आपल्या होम प्रॉडक्‍शनच्या या सिनेमामध्ये अजय देवगण नरवीर तानाजीचा लीड रोल साकारणार आहे. या ऐतिहासिक विषयावरील सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करण्याचा प्रस्ताव अजयने सैफला दिला आहे, असे समजते आहे. या प्रस्तावावर सैफ फारच गांभीर्याने विचार करतो आहे. हा प्रस्ताव त्याच्याकडून नाकारला जाण्याची शक्‍यता फारच कमी आहे. तानाजीमध्ये शिवाजी महाराजांच्या पत्नीचा रोल काजोल साकारण्याचीही शक्‍यता आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊत करतो आहे. अजय देवगण यात तानाजींच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे बजेट जवळपास १५० कोटींचे आहे. यातील सर्वाधिक खर्च वीएफएक्सवर करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या काही सहकाऱ्यांनीदेखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. तानाजी हे शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक होते.  हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटतो, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.  

टॅग्स :तानाजीसैफ अली खान अजय देवगण