Join us  

आँखे २ या चित्रपटात अमिताभ बच्चन, परेश रावल यांच्यासोबत हा अभिनेता झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 6:00 AM

गेल्या काही वर्षांत अनेक धमाकेदार चित्रपटाचे सीक्वल बनलेत. जुन्या गाजलेल्या चित्रपटाचे हे सीक्वल कधी हिट ठरलेत तर कधी फ्लॉप. आता आणखी एका गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वलची तयारी सुरू झाली आहे. हा गाजलेला चित्रपट कुठला तर २००२ मध्ये प्रदर्शित झालेला थ्रिलर चित्रपट आँखे. अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला आँखे हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, अर्जुन रामपाल, सुश्मिता सेन आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका होत्या. तीन अंध व्यक्ती एक बँक कशाप्रकारे लुटतात अशी या चित्रपटाची कथा होती. या चित्रपटाची कथा, चित्रपटातील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. आता या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आँखे २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे अनिस आझमी यांनी नुकतेच सांगितले होते. या चित्रपटात प्रेक्षकांना पहिल्या भागापेक्षा वेगळे कलाकार पाहायला मिळणार आहेत. सध्या या चित्रपटासाठी कास्टिंग सुरू असून बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांचा विचार करण्यात येत आहे. अनीस आझमी सध्या लंडनमध्ये पागलपंती या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून या चित्रपटानंतर ते आँखे २ वर काम करायला सुरुवात करणार आहेत. आँखे २ या चित्रपटासाठी सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस यांना विचारण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.डिएनए या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार, आँखे २ या चित्रपटाची कथा पाच व्यक्तिरेखांच्या भोवती फिरणार असून या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि परेश रावल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात चार पुरुषांच्या आणि एका स्त्रीची मुख्य भूमिका असून या चित्रपटातील महत्त्वाच्या दोन व्यक्तिरेखांसाठी जॅकलिन फर्नांडिस आणि सैफ अली खान यांचा विचार विचारण्यात आला आहे. सैफने आजवर अनेक थ्रिलर चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याचे या जॉनरचे चित्रपट गाजले देखील आहेत. या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करण्याचा सैफचा चांगला अनुभव असल्याने त्याला या चित्रपटात घेण्यास अनीस उत्सुक आहे. आँखे या चित्रपटात अक्षय कुमारने साकारलेल्या भूमिकेसारखीच सैफची भूमिका असणार असल्याचे डिएनएने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे.

ठळक मुद्देआँखे २ मध्ये चार पुरुषांच्या आणि एका स्त्रीची मुख्य भूमिका असून या चित्रपटातील महत्त्वाच्या दोन व्यक्तिरेखांसाठी जॅकलिन फर्नांडिस आणि सैफ अली खान यांचा विचार विचारण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांत अनेक धमाकेदार चित्रपटाचे सीक्वल बनलेत. जुन्या गाजलेल्या चित्रपटाचे हे सीक्वल कधी हिट ठरलेत तर कधी फ्लॉप. आता आणखी एका गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वलची तयारी सुरू झाली आहे. हा गाजलेला चित्रपट कुठला तर २००२ मध्ये प्रदर्शित झालेला थ्रिलर चित्रपट आँखे. 

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला आँखे हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, अर्जुन रामपाल, सुश्मिता सेन आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका होत्या. तीन अंध व्यक्ती एक बँक कशाप्रकारे लुटतात अशी या चित्रपटाची कथा होती. या चित्रपटाची कथा, चित्रपटातील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. आता या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

आँखे २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे अनिस आझमी यांनी नुकतेच सांगितले होते. या चित्रपटात प्रेक्षकांना पहिल्या भागापेक्षा वेगळे कलाकार पाहायला मिळणार आहेत. सध्या या चित्रपटासाठी कास्टिंग सुरू असून बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांचा विचार करण्यात येत आहे. अनीस आझमी सध्या लंडनमध्ये पागलपंती या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून या चित्रपटानंतर ते आँखे २ वर काम करायला सुरुवात करणार आहेत. आँखे २ या चित्रपटासाठी सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस यांना विचारण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.

डिएनए या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार, आँखे २ या चित्रपटाची कथा पाच व्यक्तिरेखांच्या भोवती फिरणार असून या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि परेश रावल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात चार पुरुषांच्या आणि एका स्त्रीची मुख्य भूमिका असून या चित्रपटातील महत्त्वाच्या दोन व्यक्तिरेखांसाठी जॅकलिन फर्नांडिस आणि सैफ अली खान यांचा विचार विचारण्यात आला आहे. सैफने आजवर अनेक थ्रिलर चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याचे या जॉनरचे रेस, रेस २ यांसारखे चित्रपट गाजले देखील आहेत. या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करण्याचा सैफचा चांगला अनुभव असल्याने त्याला या चित्रपटात घेण्यास अनीस उत्सुक आहे. आँखे या चित्रपटात अक्षय कुमारने साकारलेल्या भूमिकेसारखीच सैफची भूमिका असणार असल्याचे डिएनएने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. 

टॅग्स :सैफ अली खान जॅकलिन फर्नांडिसअमिताभ बच्चन