Join us  

देव, धर्म आणि पुनर्जन्मावर बोलला सैफ अली खान, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 3:31 PM

धार्मिक अंगानं सैफनं आजपर्यंत बरीच टीका सहन केली आहे.  आता ‘भूत पुलिस’ या चित्रपटाच्या निमित्तानं सैफ अली खाननं धर्म आणि पुनर्जन्मावर मत व्यक्त केलंय.

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सैफचा ‘भूत पुलिस’ हा सिनेमा उद्या 10 सप्टेंबरला डिस्रे हॉटस्टारवर रिलीज होतोय.

‘रावण खलनायक नव्हता’, या सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) एका वक्तव्यावरून मध्यंतरी मोठं वादळ उठलं होतं. वाद चिघळण्याची चिन्हं दिसताच सैफनं माफीही मागितली होती. त्याच्या ‘तांडव’ या वेबसीरिजमध्येही हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप झाला होता. मुलांच्या नावावरूनही तो ट्रोल झाला होता. एकंदर काय तर धार्मिक अंगानं सैफनं आजपर्यंत बरीच टीका सहन केली आहे.  आता ‘भूत पुलिस’ या चित्रपटाच्या निमित्तानं सैफ अली खाननं धर्म आणि पुनर्जन्मावर मत व्यक्त केलंय.खºया आयुष्यात मी नास्तिक आहे, असा खुलासा त्यानं एका मुलाखतीत केला.  

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, ‘ख-या आयुष्यात मी नास्तिक आहे. त्या अर्थानं मी धर्मनिरपेक्ष आहे. टोकाचा धार्मिकपणा माझ्या चिंतेला कारणीभूत ठरतो. माझी चिंता वाढवतो. अनेक धर्म मृत्यूनंतरच्या गोष्टी करतात. याऊलट वर्तमान आयुष्यावर बोलणं टाळतात.  माझ्या मते, धर्म ही एक  संघटना आहे आणि यात अनेक समस्या आहे. माझा देव श्रेष्ठ, तुझा देव श्रेष्ठ अशा गोष्टींमध्ये लोक अडकून पडतात. मी यापेक्षा माझी ऊर्जा माझ्या कामावर केंद्रीत करण्याचा प्रयत्न करतो. मी प्रार्थना करतो आणि माझं काम करतो. मला वाटतं मी जास्त आध्यात्मिक आहे. 

पुनर्जन्मावरही तो बोलला. तो म्हणाला, मृत्यूनंतर काय होतं, याबद्दल जाणून घेण्यात मला काहीही रस नाही. मला वाटतं, एकदा तुमचा मृत्यू झाला की सगळं संपलं. मग त्यानंतर काहीही उरत नाही. धर्मविषयक नियम माझ्यावर फारसा फरक पडत नाही.वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सैफचा ‘भूत पुलिस’ हा सिनेमा उद्या 10 सप्टेंबरला डिस्रे हॉटस्टारवर रिलीज होतोय. यात अर्जुन कपूर, यामी गौतम व जॅकलिन फर्नांडिस यांच्याही मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात सैफने विभूती नावाचं पात्र साकारलं आहे. जो पैशांसाठी भूत पकडतो.  या शिवाय सैफ ‘आदिपुरुष’ या सिनेमात रावणाच्या भूमिकेत झळकणार आहे.

टॅग्स :सैफ अली खान