Join us  

3 महिन्यांनंतर सई ताम्हणकर परतली सेटवर, लॉकडाऊननंतर असा होता शूटिंगचा पहिला दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 3:56 PM

अनलॉकमुळे मनोरंजन सृष्टी काही दिवसांपूर्वी पुन्हा जोमाने सुरू झाली आहे.

लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळात कधीही न थांबणारी मनोरंजन सृष्टी थांबली होती. अनेक चित्रपट, मालिका, वेब सीरिज यांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. आता मात्र अनलॉकमुळे मनोरंजन सृष्टी काही दिवसांपूर्वी पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरने  सोमवारपासून चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. सोमवारी सई तिच्या रिएलिटी शोच्या चित्रीकरणस्थळी पोहोचली. तब्बल तीन महिन्यांनी पुन:श्च हरिओम करताना सई ताम्हणकर खूप उत्साहित होती.

सई म्हणाली, “पुन्हा एकदा चित्रीकरणाला परतताना खूप संमिश्र भावना आहेत. एकिकडे थोडीशी भीती आणि चिंता दाटून आली असतानाच मन खूप उत्साहित झालेले आहे. सेटवर डॉक्टर आहेत. रूग्णवाहिकाही बोलवण्यात आलीय. सेटवर आल्याआल्या टेंपरेचर चेक करणे, सतत हात धूणे, सॅनिटायझर बाळगणे. अशा सेटवर सगळ्या सावधगिरीच्या उपाययोजना बाळगल्या जातायत. लोकांना टीव्हीवरचे तेचतेच एपिसोड पाहून कंटाळा आल्याने नव्या एपिसोडचे चित्रीकरण सुरू केले आहे. तेव्हा आपल्या सर्वांचा आशीर्वाद असू द्या.”   

 बॉलिवूड चित्रपट ‘मीमी’च्या सेटवर अपघात होऊन पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही, लॉकडाऊन होणार हे कळल्यावर दुखापत झालेल्या पाय तसाच घेऊन सई मार्च महिन्यात रिएलिटी शोच्या चित्रीकरणासाठी पोहोचली होती. आताही लॉकडाउन उघडल्यावर निर्माते आणि प्रेक्षकांसाठी असलेली आपली बांधिलकी जपत, सई ताम्हणकर चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचली.

टॅग्स :सई ताम्हणकर