Join us  

काश्मिरी पंडितांवरील वादग्रस्त वक्तव्यावर साई पल्लवीचे स्पष्टीकरण, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 12:48 PM

Sai Pallavi Controversy: दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने तिच्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Sai Pallavi Controversy: साऊथची सुपरस्टार साई पल्लवी (Sai Pallavi ) बिनधास्त बोलण्यासाठी ओळखली जाते. तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, साईने काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिचिंगशी तुलना केली होती. तिच्या या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर वातावरण तापले. काही लोक तिला सपोर्ट करत आहेत तर काही तिच्यावर भडकले आहेत. दरम्यान, यात आता साई पल्लवीने स्पष्टीकरण दिले आहे. तिने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत झालेल्या प्रकारावर आपले मत मांडले आहे.

साई पल्लवीने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये साई तिच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये साई आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत आहे. साई म्हणते की, 'मी नेहमीच माझ्या मनातलं मोकळेपणाने बोलणाऱ्यांपैकी एक आहे. मला माहीत आहे की, मला बोलायला उशीर झाला आहे, पण मला माफ करा. माझे शब्द वेगळ्या अर्थाने मांडले गेले. मला एवढेच सांगायचे होते की, धर्माच्या नावावर कोणताही वाद होणे ही चुकीची गोष्ट आहे. मी एक तटस्थ व्यक्ती आहे. मी जे काही बोलले ते, चुकीच्या पद्धतीने घेतले आणि मांडले गेले, याचा मला धक्का बसला आहे."

नेमका वाद काय आहे?चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान साई पल्लवीने आपल्या एका मुलाखतीत 'द काश्मीर फाइल्स'मधील काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि त्यांच्या हत्येच्या दृश्याची तुलना मॉब लिंचिंगशी केली होती. तिने म्हटले होते की, 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात काश्मिरी पंडितांची हत्या कशी होते हे दाखवण्यात आले आहे. काही काळापूर्वी गाय घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीला बेदम मारहाण करून जय श्री राम म्हणण्यास सांगितले होते. ही सुद्धा धर्माच्या नावावर होणारी हिंसा आहे.या दोन घटनांमध्ये फरक काय? मी तटस्थ राहून पीडितांच्या बाजूने उभी राहण्याचा प्रयत्न करते.' तिच्या या वक्तव्यानंतर ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.

टॅग्स :साई पल्लवीद काश्मीर फाइल्सलीचिंग