Join us  

अरे व्वा ! विनामेकअपही सुंदर दिसते ही अभिनेत्री,तर २ कोटींची फेअरनेस क्रिमची जाहिरात करण्यासही दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 1:13 PM

साई पल्लवीला 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहिरात ऑफर करण्यात आली होती. तिने दोन कोटींची ही ऑफरदेखील धुडकावून लावली होती. त्यावेळी तिची खूप चर्चा झाली होती.

चंदेरी दुनियेत काम करत असताना तुमची मेकअप करणे गरजेचे. मग ते शूटिंगसाठी असो किंवा पुरस्कार सोहळे असो ऑफस्क्रीनदेखी सेलिब्रेटी मेकअप करूनच हजेरी लावल्याचे पाहायला मिळते. मेकअप केल्याने व्यक्तिमत्त्व अधिक खुलते म्हणून मेकअप हा महत्त्वाचा भागच मानला जातो. मात्र एक अभिनेत्री आहे जी नेहमीच विनामेकअप राहणे पसंत करते. फक्त शूटिंगसाठीच मेकअपचा वापर केला जातो तितकाच एरव्ही ती विनामेअकपच दिसते. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील  साई पल्लवी. विशेष म्हणजे साई पल्लवीला 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहिरात ऑफर करण्यात आली होती. तिने  दोन कोटींची ही ऑफरदेखील धुडकावून लावली होती. त्यावेळी तिची खूप चर्चा झाली होती. 

 

यावर तिने म्हटले होते की, फेअरनेस क्रिमने काहीच होत नाही. हे आपल्या सा-यांना माहिती आहे. उगाच अशा फसव्या जाहिराती करून लोकांना फसवणे मला आवडत नाही. प्रामाणिकपण काम करून पैसा कमवायचा आहे. अशा फसव्या गोष्टी करून मी लोकांची दिशाभूल तर करेन पण स्वतःलाही फसवेल जे मला कधीच मान्य नाही.

पल्लवीनं आतापर्यंत तमिळ, मल्याळम आणि तेलुगू सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिनं आतापर्यंत 'अथिरन', 'फिदा' , 'काली' , 'प्रेमम' हे सुपरहिट सिनेमा दिले आहे. त्यामुळे ती साऊथची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. साईला मेकअपपासून लांबच राहणे पसंत करते. ती जशी आहे तसे तिला रसिकांना स्विकारावे तसेच चेह-यापेक्षा कलागुणांना महत्त्व देणारे कधीच आपण कसे दिसतो याला महत्त्व देत नसल्याचे तिचे ठाम मत आहे.

टॅग्स :साई पल्लवी