Join us  

‘सेक्रेड गेम्स’ची ट्रान्सजेंडर ‘कुक्कू’! असा दिला तो इमोशनल सीन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 8:03 AM

भारताची पहिली ओरिजनल नेटफ्लिक्स सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ सध्या प्रचंड गाजते आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीने दिग्दर्शित केलेल्या या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे आणि कुबरा सैत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

भारताची पहिली ओरिजनल नेटफ्लिक्स सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ सध्या प्रचंड गाजते आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीने दिग्दर्शित केलेल्या या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे आणि कुबरा सैत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कुबरा सैत हे नाव आपल्यासाठी काहीसे नवे आहे. कुबराने या सीरिजमध्ये कुक्कू नावाच्या तृतीयपंथियाची भूमिका साकारली आहे. कुबराचे मानाल तर ही भूमिका साकारणे सोपे नव्हते. या सीरिजमध्ये कुबराने एक इमोशनल सीन दिला आहे. पण हा सीन साकारताना कुबरा इतकी नर्व्हस झाली की, तिला जमता जमेना. मग काय, अनुरागने कुबराला व्हिस्की दिली आणि त्यानंतर कुठे कुबराने ते दृश्य दिले.पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत ती बोलली.

तिने  सांगितले  की, तो सीन समजावून सांगण्यासाठी अनुरागने मला व्हॅनिटीमध्ये बोलवले. या सीनमध्ये मला रडायचे होते. पण मला रडायचे आहे, म्हटल्यावर मला जाम टेन्शन आले. मी नर्व्हस होते आणि अनुराग हसत सुटला होता. होईल ग, होईल ग, असे तो सारखा म्हणू लागला. मग अचानक, तू काय घेतेस, असे त्याने मला विचारले. मी वाईन पिते, असे त्याला सांगितले. त्याने मला व्हिस्कीचा एक ग्लास दिला आणि लाईन वाचू लागला. क्षणभरात माझे भरलेले डोळे आणि माझा मूड पाहून अनुरागने माझ्या अफेअरचा विषय काढला. मी अचानक इमोशनल झाले. मी ज्या व्यक्तिवर पहिल्यांदा मनापासून प्रेम केले, ती व्यक्ति अचानक गायब झाली, असे सांगून मी रडू लागले.

नेमक्या याच क्षणाला अनुरागने मला तो सीन समजावून सांगितला. मी रडत होते आणि तोच कुक्कूचा सीन होता. ती गायतोंडेवर प्रेम करू लागते. पण तो आपल्याला सोडून जाणार, हे तिला माहित होते. माझे रडणे थांबत नव्हते. ही ठीक होईल, तेव्हा हिला सेटवर घेऊन ये, असे अनुरागने कुणातरी सांगितले आणि तो व्हॅनिटीबाहेर गेला. यानंतर आम्ही तो सीन केला. मी सात टेक दिलेत. सीन पूर्ण झाल्यावर माझ्या मनात एकच विचार होता. कुक्कूचे मन तुटले होते की कुबराचे?

 

टॅग्स :सैफ अली खान