Join us  

कुबरा सैतला लोक समजू लागलेत तृतीयपंथी; जिथे जाईल तिथे विचारला जातो हा एकच प्रश्न!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 12:09 PM

भारताची पहिली ओरिजनल नेटफ्लिक्स सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ प्रचंड गाजली.  या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे आणि कुबरा सैत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पण सर्वाधिक चर्चा झाली ती, कुबराने साकारलेल्या भूमिकेची.

भारताची पहिली ओरिजनल नेटफ्लिक्स सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ प्रचंड गाजली. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीने दिग्दर्शित केलेल्या या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे आणि कुबरा सैत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पण सर्वाधिक चर्चा झाली ती, कुबराने साकारलेल्या भूमिकेची. होय, कुबराने या सीरिजमध्ये कुक्कू नावाच्या तृतीयपंथियाची भूमिका साकारली आहे. कुबराने ही भूमिका इतकी प्रभावीपणे पडद्यावर साकारली की, लोकांनी तिला खरोखरचं तृतीयपंथी समजले. म्हणूनच तू तृतीयपंथी आहेस का? असा प्रश्न तिला अनेक मुलाखतीत विचारण्यात आला. यावर कुबराने रोचक उत्तर दिले.मिड डेला दिलेल्या मुलाखतीत कुबरा यावर बोलली. तू तृतीयपंथी आहेस का? असा प्रश्न मला विचारला जातो. हा प्रश्न मला माझी प्रशंसा केल्यासारखा वाटतो. मी माझ्या तृतीयपंथियाच्या भूमिकेत इतका जीव ओतला की, लोक ते खरे मानायला लागले. हीच माझ्या कामाची पावती आहे, असे कुबरा म्हणाली. मी तृतीयपंथीयाची भूमिका तितकीच प्रामाणिकपणे साकारली, जितकी सहा वर्षांच्या वयात शाळेच्या एका कार्यक्रमात एक झाडाची भूमिका साकारली होती, असेही ती म्हणाली.कुबराने ‘सेक्रेड गेम्स’मध्ये न्यूड सीन दिला आहे. काही दिवसांपूर्वी कुबरा यावरही बोलली होती. कुबराचे मानाल तर ही भूमिका साकारणे सोपे नव्हते. या सीरिजमध्ये कुबराने एक इमोशनल सीन दिला आहे. पण हा सीन साकारताना कुबरा इतकी नर्व्हस झाली की, तिला जमता जमेना. मग काय, अनुरागने कुबराला व्हिस्की दिली आणि त्यानंतर कुठे कुबराने ते दृश्य दिले.

 

टॅग्स :कुबरा सैत