Join us  

‘सेक्रेड गेम्स 2’मधील गुरुजींच्या आश्रमाला तुम्हीही देऊ शकता भेट !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 11:58 AM

‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सीझनमध्ये गुरुजी, त्यांचा भव्य आश्रय, त्यांच्या तोंडचे ‘अहं ब्रह्मास्मी’ हे गुरुवचन सगळेच हिट झाले आहे. आज आम्ही तुम्हाला गुरुजींच्या भव्य आश्रमाबद्दल सांगणार आहोत.

ठळक मुद्देविक्रम चंद्राची कादंबरी ‘सेक्रेड गेम्स’वर आधारित या सीरिजच्या दुस-या सीझनचे दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि नीरज घेवान यांनी मिळून केले आहे.

‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सच्या पहिल्या ओरिजनल वेबसीरिजचे पहिले सीजन तुफान गाजले आणि 405 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित करण्यात आला. गत 14 ऑगस्टला मध्यरात्रीनंतर ‘सेक्रेड गेम्स 2’ स्ट्रीम केले गेले. सध्या या सीरिजने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. ‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सीझनमध्ये अनेक नवी पात्र आहेत. यापैकीच एक म्हणजे गुरुजी. पंकज त्रिपाठी यांनी ही भूमिका साकारली आहे. पहिल्या सीझनमध्ये गणेश गायतोंडे भाव खाऊन गेला. या सीझनमध्ये गुरुजी गायतोंडेवर भारी पडताना दिसत आहेत. गुरुजी, त्यांचा भव्य आश्रय, त्यांच्या तोंडचे ‘अहं ब्रह्मास्मी’ हे गुरुवचन सगळेच हिट झाले आहे. आज आम्ही तुम्हाला गुरुजींच्या भव्य आश्रमाबद्दल सांगणार आहोत.

‘सेक्रेड गेम्स 2’मधील गुरुजींचा भव्यदिव्य आश्रम पाहतांना आपण थक्क होतो. हा आश्रम म्हणजे, एकतर सेट असावा किंवा सेट नसलाच विदेशातले एखादे ठिकाण असावे, असेच अनेकांना वाटते. पण असे काहीही नाही. होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण गुरुजींचा हा आश्रम भारतात आहे. तोही दिल्लीत.

होय, ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये दाखवण्यात आलेला हा आश्रम दिल्लीत आहे. पण प्रत्यक्षात तो आश्रम नसून एक पंचतारांकित हॉटेल आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला हे हॉटेल असून रोसेट हाऊस असे या हॉटेलचे नाव आहे.

याच हॉटेलला आश्रमाचा लूक देण्यात आला आणि याठिकाणी गणेश गायतोंडे व गुरुजी यांच्यातील अनेक सीन्स शूट झालेत.

या हॉटेलात आश्रमा इतकीच शांतता आहे. अर्थात ही शांतता अनुभवायची असेल तर तुम्हाला पैसे मोजावे लागणार. कारण गजबजलेल्या दिल्लीत ही शांतता अनुभवायलाही पैसे पडतात.

विक्रम चंद्राची कादंबरी ‘सेक्रेड गेम्स’वर आधारित या सीरिजच्या दुस-या सीझनचे दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि नीरज घेवान यांनी मिळून केले आहे. पहिल्या सीझनमध्ये आपण गणेश गायतोंडेच्या नजरेतून मुंबई शहर पाहिले आणि त्यासोबतच गणेश गायतोंडे कसा मोठा झाला हेही पाहिलें.  दुसरा सीझन हा गणेश गायतोंडेच्या पतनावर आहे. तेच दुसरीकडे चांगला मित्र असलेल्या हवालदार काटेकरच्या मृत्युने दु:खी सरताज सिंगचे जगणेही दाखवले आहे. तो अजूनही गायतोंडेच्या मिस्ट्रीमध्ये अडकलेला आहे. 

टॅग्स :सॅक्रेड गेम्सनेटफ्लिक्सपंकज त्रिपाठीनवाझुद्दीन सिद्दीकी