Join us  

सोशल मीडियावर मुमताज यांच्या निधनाची अफवा, मुलीने केला ‘हा’ खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 2:06 PM

कालपासून सोशल मीडियावर प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांच्या निधनाची अफवा पसरविली जात आहे. मात्र ही पूर्णत: अफवा असून, त्यात काहीही तथ्य नाही.

कालपासून सोशल मीडियावर ६० आणि ७०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांच्या निधनाची बातमी वाºयासारखी व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वृत्तात सांगण्यात येत आहे की, झोपेतच कॉर्डियाक अरेस्टमुळे मुमताज यांचे निधन झाले. मात्र हे वृत्त पूर्णत: तथ्यहीन असून, मुमताज यांची प्रकृती स्थिर असल्याचा खुलासा त्यांच्या मुलीने केला आहे. तान्या माधवानी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. त्याचबरोबर चाहत्यांनी अशाप्रकारच्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्वयंघोषित क्रिटिक्स केआरके यानेदेखील ट्विट करून मुमताज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. केआरकेने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘मुमताज यांचे निधन झाले. अशी दु:खद घटना तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी माफी मागतो.’ दरम्यान, व्हायरल होत असलेली पोस्ट तथ्यहीन असल्याचा उलगडा त्यांच्या मुलीने केल्याने चाहत्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मुमताज यांच्या निधनाच्या अफवेमुळे चाहत्यांमध्ये दु:ख व्यक्त केले जात होती. कारण पोस्टमध्ये लिहिण्यात आले होते की, मुमताज यांचे रात्री निधन झाले असून, शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. कारण त्यांची मुलगी यूएसए येथे राहत असून, मुंबईत येण्यासाठी तिला काही वेळ लागणार आहे. परंतु आता त्यांच्या मुलींनेच खुलासा केल्यामुळे ही पूर्णत: अफवा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मुमताज या ६० आणि ७०च्या दशकातील अतिशय प्रसिद्ध अशा अभिनेत्री आहेत. त्यांनी त्यांच्या अनेक भूमिका अजरामर केल्या.