Join us

​रेखा यांचा स्पेशल एपिसोड अन् अमिताभ बच्चन यांचे ट्विट ; याला योगायोग म्हणायचे की आणखी काही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 12:03 IST

बॉलिवूडच्या एव्हरग्रीन स्टार रेखा अलीकडे ‘राईजिंग स्टार’ या लाईव्ह सिंगींग रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसल्या. रेखा ज्या कुठल्या शोमध्ये जातात, त्या ...

बॉलिवूडच्या एव्हरग्रीन स्टार रेखा अलीकडे ‘राईजिंग स्टार’ या लाईव्ह सिंगींग रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसल्या. रेखा ज्या कुठल्या शोमध्ये जातात, त्या शोला  ‘चार चाँद’ लावतात. ‘राईजिंग स्टार’ या शोबद्दलही हेच झाले. शोमधील रेखांच्या अदांनी सर्वांनाच वेड लावले. अगदी सुरूवातीपासून शेवटपर्यंत शोमध्ये रेखा आणि रेखा यांचाच जलवा दिसला. या स्पेशल एपिसोडमध्ये सर्व स्पर्धकांनी रेखा यांचीच सदाबहार गाणी गायलीत. त्यांचे अनेक यादगार संवाद म्हटले. एकूण काय तर सर्वांनी अगदी धूम केली. एका कंटेस्टंटसाठी रेखा स्वत: स्टेजवर पोहोचल्या. कंटेस्टंट गात होती आणि रेखा यांनी तिच्या गाण्यावर ठेका धरला होता. याचदरम्यान ‘राईजिंग स्टार’चे जज शंकर महादेवन यांनी रेखा यांना तामिळ गाणे गायची विनंती केली. शंकर यांच्या विनंतीला मान देत, रेखांनी सूर लावला. यानंतर शंकर यांनी या तामिळ गाण्याचा हिंदी अर्थ सर्वांना सांगितला. केवळ इतकेच नाही तर you rocked the show अशी कॉम्प्लिमेंट त्यांनी रेखांना दिला. ही कॉम्प्लिमेंट ऐकून रेखांनी शंकर यांना ‘चुम्मा’ म्हटले. रेखांच्या तोंडचा ‘चुम्मा’ शब्द ऐकून शंकर यांना राहावले नाहीच. त्यांनी लगेच तामिळमध्ये ‘चुम्मा’ला काय म्हणतात, ते सांगितले.तामिळमध्ये ‘चुम्मा’ला ‘Simply’ म्हणतात, असे त्यांनी सांगितले. याच क्रमात रेखांना ‘जुम्मा चुम्मा’आठवले. अर्थात त्यांनी लगेच विषय बदलला. यानंतर शोमध्ये बराच वेळ ‘Simply’ची चर्चा रंगली. हा शब्द सगळ्यांच्या तोंडी दिसला. आश्चर्य म्हणजे, बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापर्यंतही हा शब्द पोहोचला. खरे तर ते शोमध्ये नव्हते. पण या शोनंतर काही वेळात त्यांनी एक  ट्विट केले. (हा शो रात्री ९ ते ११ दरम्यान प्रसारित होतो. बिग बींनी हे  ट्विट रात्री १०.५४ ला केले.)या ट्विटमध्ये त्यांनी हाच ‘Simply’ शब्द लिहिला. आता याला योगायोग म्हणायचे की अमिताभ यांनी ‘राईजिंग स्टार’चा रेखा स्पेशल एपिसोड पाहिला, असे समजायचे, हे ज्याचे त्यानेच ठरवायचे.ALSO READ : रेखा यांनी महानायक अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या रायला लिहिले ओपन लेटर!