Join us  

RRR ठरली 'बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म', गोल्डन ग्लोबनंतर क्रिटिक्स चॉईस अवॉर्डही पटकावला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 9:21 AM

गोल्डन ग्लोब' मध्ये 'बेस्ट ओरिजिनल सॉंग' हे अवॉर्ड पटकावल्यानंतर बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म या नामांकनात आरआरआरने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स पटकावला आहे.

RRR : एस एस राजामौली यांच्या 'आरआरआर' सिनेमाचा अवॉर्ड्सचा धडाका अजुनही सुरुच आहे. 'गोल्डन ग्लोब' मध्ये 'बेस्ट ओरिजिनल सॉंग' हे अवॉर्ड पटकावल्यानंतर आता आरआरआर क्रिटिक्स चॉईस अवॉर्डवरही नाव मिळवले आहे. बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म या नामांकनात आरआरआरने  क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स पटकावला आहे.

'आरआरआर' सिनेमाने जगभरात भारताचे नाव उंचावले आहे. क्रिटिक्स  चॉईस अवॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर आरआरआरचे कौतुक करण्यात आले आहे. ट्विटमध्ये म्हणले आहे की, 'RRR सिनेमाच्या कास्ट अॅंड क्रूचे अभिनंदन. सिनेमाने बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्मसाठी क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड आपल्या नावावर केला आहे. 

बेस्ट फॉरेन लॅंग्वेजसाठी ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अर्जेंटीना १९८५, बार्डो, फॉल्स क्रॉनिकल ऑफ ए हॅंडफुल ऑफ ट्रुथ्स, क्लोज, आणि डिसीजन टू लीव या सिनेमांनाही नामांकन होते. या सगळ्यांना मागे टाकत आरआरआरने बाजी मारली आहे.

एसएस राजामौली यांनी हातात ट्रॉफी घेत पोज दिली. आरआरआर या तेलगू चित्रपटाने आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. २४ मार्च २०२२ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि आता सिनेमाने एकामागोमाग एक अनेक पुरस्कार नावावर केले आहेत. आता सिनेमा ऑस्कर शर्यतीत दाखल झाला आहे .

टॅग्स :आरआरआर सिनेमाएस.एस. राजमौलीज्युनिअर एनटीआर