Join us  

टॉलिवूडमध्ये होणार घमासान! 2022 मध्ये भिडणार रामचरण, प्रभास अन् पवन कल्याण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 2:08 PM

Tollywood : साऊथ इंडस्ट्रीत 2022 या वर्षाची सुरूवात धमाकेदार होणार आहे. होय, 2022 च्याजानेवारीत तीन धमाकेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

साऊथ इंडस्ट्रीत 2022 या वर्षाची सुरूवात धमाकेदार होणार आहे. होय, 2022 च्या पहिल्याच महिन्यांत म्हणजे जानेवारीत तीन धमाकेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. काही दिवसांच्या अंतराने हे तीन सिनेमे रिलीज होणार असल्याने साहजिकच बॉक्स ऑफिसवरही मोठा ‘क्लॅश’ पाहायला मिळणार आहे.

जानेवारीच्या पहिल्या शुक्रवारी रिलीज होतोय RRRजानेवारी 2022 च्या पहिल्याच आठवड्यात ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा ‘आरआरआर’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. सुपरस्टार रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर या जबरा जोडीच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. कोरोना महामारीमुळे हा सिनेमा लांबणीवर पडला होता. पण येत्या 7 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होतोय.

 ‘आरआरआर’नंतर लगेच ‘Bheemla Nayak’ ‘आरआरआर’ रिलीज झाल्यानंतर बरोबर सहा दिवसांनी म्हणजे जानेवारीच्या दुस-या बुधवारी टॉलिवूडचा पॉवर स्टार पवन कल्याण आणि राणा दुग्गुबाती यांचा ‘भीमला नायक’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. हा चित्रपट ‘अय्यपनम कोशियम’ या ब्लॉकबस्टर सिनेमाचा तेलगू रिमेक आहे.

दोन दिवसानंतर ‘Radhe Shyam ’ ‘भीमला नायक’ रिलीज झाल्यानंतर लगेच दोन दिवसांनी म्हणजे जानेवारीच्या दुसºया शुक्रवारी सुपरस्टार प्रभासचा ‘राधेश्याम’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आरआरआर आणि राधेश्याम यांच्या रिलीजमध्ये केवळ 8 दिवसांचा फरक आहे. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत.

आरआरआर, भीमला नायक आणि राधेश्याम या तिन्ही चित्रपटांची जोरदार चर्चा आहे. या तिन्ही सिनेमांकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. आता या तीन पैकी बॉक्स ऑफिस कोणता चित्रपट धुमाकूळ घालतो, ते पाहायला सर्वच उत्सुक आहेत.

टॅग्स :Tollywoodप्रभास