Join us  

अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मलायका अरोराने शेअर केला रोमँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 6:37 PM

मलायका अरोरा हिने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला त्याच्या ३६व्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्यूट अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आज ३६वा वाढदिवस साजरा करतो आहे. या निमित्ताने अर्जुन कपूरवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो आहे. दरम्यान त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री मलायका अरोरा हिने देखील सोशल मीडियावर त्या दोघांचा रोमँटिक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

मलायका अरोरा हिने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला त्याच्या ३६व्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्यूट अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिचा आणि अर्जुन कपूरचा रोमँटिक फोटो शेअर करत लिहिले की, माझा सनशाइन. या फोटोत अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा वर्कआउटच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत. त्यांच्या या रोमँटिक फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

अर्जुन कपूर, मलायका अरोरासोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते. अर्जुन कपूर स्वतःपेक्षा १२ वर्षांपेक्षा मोठ्या मलायकाला डेट करत आहे आणि दोघे खुल्लमखुल्ला प्रेम व्यक्त करताना दिसते. अर्जुन मलायकापेक्षा वयाने १२ वर्षे लहान आहे.

अर्जुनचे वय ३५ वर्षे तर मलायकाचे वय ४७ वर्षे आहे. सुरूवातीला अर्जुन कपूर आणि मलायका अरोराने नाते लपवून ठेवले होते. मात्र २०१९ मध्ये अर्जुन कपूरच्या वाढदिवसादिवशी दोघांनी रिलेशनशीपबद्दल सर्वांना सांगितले होते. त्यानंतर दोघे एकत्र व्हॅकेशनला जातात आणि एकमेकांसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दोघांनी यावेळी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन गोव्यात केले होते आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत येत असतात.

अर्जुन कपूर शेवटचा सरदार का ग्रॅण्डसनमध्ये दिसला होता. लवकरच तो भूत पुलिसमध्ये दिसणार आहे. तर मलायका अरोरा लवकरच इंडियाज बेस्ट डान्सरच्या पुढील सीझनमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासोबत गीता कपूर आणि टेरेंस लुईसपण परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा