Join us

२१ फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर रोमान्सचा किंग शाहरूख खान होणार भूत, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 22:35 IST

बॉलिवूड किंग म्हणून ओळखल्या जाणाºया शाहरूख खानने आतापर्यंत इंडस्ट्रीत २१ फ्लॉप चित्रपट दिले आहेत. कदाचित हे ऐकूण कोणालाही विश्वास ...

बॉलिवूड किंग म्हणून ओळखल्या जाणाºया शाहरूख खानने आतापर्यंत इंडस्ट्रीत २१ फ्लॉप चित्रपट दिले आहेत. कदाचित हे ऐकूण कोणालाही विश्वास बसणार नाही, परंतु हे खरं आहे. मात्र अशातही किंग पुन्हा एकदा नव्या दमाने नव्या आव्हानांचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. त्यासाठी तो पुन्हा एकदा नवे एक्सपेरिमेंट करीत आहे. खरं तर चित्रपट फ्लॉप होत असला तरी, शाहरूख कधीही हताश झाला नाही. तो पुन्हा नव्या दमाने कामाला लागला आहे. शाहरूखचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर अत्यंत वाईट पद्धतीने फ्लॉप झाला. कारण कोणीही चित्रपटाच्या अशा अपयशाची अपेक्षा केली नव्हती. असो, आता शाहरूख पुन्हा एकदा जोमाने त्याच्या नव्या प्रोजेक्टवर काम करीत आहे. यासाठी तो काही प्रयोगही करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एका हॉरर चित्रपटावर तो काम करीत आहे. वास्तविक शाहरूखने या अगोदरही ‘चमत्कार’ या हॉररपटात काम केले आहे. परंतु हा चित्रपट काहीसा कॉमेडी असल्याने त्यातील भय फारसे जाणवले नाही. चित्रपटात नसिरूद्दीन शाह यांनी भुताची भूमिका साकारली होती. त्यावेळी चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्लाही जमविला होता. आता शाहरूख पुन्हा एकदा हॉररचा फॉर्म्युला आजमावून बघत आहे. आतापर्यंत हॉरर चित्रपट बनविण्याचे श्रेय रामगोपाल वर्मा, विक्रम भट्ट, बिपाशा बासू यांच्या नावे आहे. परंतु आता या लिस्टमध्ये शाहरूखचेही नाव जोडले जाणार आहे. असो, आतापर्यंत शाहरूखचे ‘अशोका, रावन, फिर भी दिल है हिन्दुस्तानी, फॅन, स्वदेश, त्रिमूर्ती, दिल से, वन टू का फोर, पहेली’ आदी चित्रपट फ्लॉप झाले आहेत. शाहरूखने आतापर्यंत २१ फ्लॉप चित्रपट दिले आहेत. खरं तर त्याने नेहमीच त्याच्या चाहत्यांना काही तरी नवे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता त्याचा हा नवा एक्सपेरिमेंट प्रेक्षकांना कितपत भावेल हे येत्या काळात स्पष्ट होईल. दरम्यान, शाहरूखच्या या हॉरर चित्रपटाविषयी अद्यापपर्यंत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच या चित्रपटाबरोबरच शाहरूख एका चित्रपटात बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार असल्याचीही जोरदार चर्चा रंगत आहे.