Join us

भूमिकेशी कम्फर्टेबल असायला हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 15:05 IST

 ‘क्वीन आॅफ सिक्वेल’ अशी जिची ख्याती आहे ती श्रद्धा दास हिेने तेलगु, कन्नड, मल्याळम आणि तमीळ चित्रपटांमध्येही काम केले ...

 ‘क्वीन आॅफ सिक्वेल’ अशी जिची ख्याती आहे ती श्रद्धा दास हिेने तेलगु, कन्नड, मल्याळम आणि तमीळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. चित्रपटाच्या विविध प्रादेशिक भाषांमध्ये तिने काम केले आहे. आता तिला हिंदी बॉलीवूडमध्ये तिचा चार्म आजमवायचा आहे. तिने नुकतेच ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ मध्ये अफताब शिवदासानी याच्या पत्नीची भूमिका केली आहे. हा चित्रपट एक सेक्स कॉमेडी असून त्याने १०० कोटी रूपयांपेक्षा जास्त बिझनेस केला आहे. याबद्दल बोलताना ती म्हणते,‘ आपण कुठल्याही चित्रपटात काम करायचे म्हटल्यास आपल्यासोबतच्या कलाकारांसोबत कम्फर्टेबल असणे गरजेचे असते. अन्यथा त्याच्यासोबत काम कसे करू शकणार ? याअगोदर अनेक सेक्स कॉमेडीज झाल्या पण, गे्रट ग्रँड मस्तीप्रमाणे कुठल्याच चित्रपटात काम करताना मजा आली नसावी, असे वाटते.