Join us

भूमिका चावला कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:19 IST

भूमिका चावला परततेयस लमान खान यांच्या 'तेरे नाम' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणारी भूमिका चावला काही चित्रपट करूनच गायब ...

भूमिका चावला परततेयस लमान खान यांच्या 'तेरे नाम' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणारी भूमिका चावला काही चित्रपट करूनच गायब झाली. परंतु, आता चाहत्यांसाठी एक खुशखबरी आहे. कळाले आहे की, क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावरील बायोपिक मधून ती कमबॅक करणार आहे. नीरज पांडे निर्देशित या बायोपिकमध्ये भूमिका महत्त्वाच्या रोलमध्ये दिसणार आहे. तिच्यावर एक महत्त्वाचा सिक्वेन्सही चित्रित केला जाणार आहे. भूमिका म्हणाली,' हो मी हा चित्रपट करत आहे. पण, चित्रपटातील माझा रोल याशिवाय मी काहीही सांगू शकत नाही. खुप वर्षांनंतर मी हिंदी चित्रपट करण्यासाठी उत्सुक आहे. ती याअगोदर २00७ मध्ये 'गांधी, माय फादर' मध्ये दिसली होती. त्यानंतर तिने साऊथच्या चित्रपटांकडे दिशा वळवली.