Join us  

रोहित शेट्टी सांगतोय, कशी सुचली ‘सिम्बा’ची कल्पना ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 10:58 AM

तूर्तास ‘सिम्बा’ची संपूर्ण स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काल रविवारी ‘सिम्बा’ची टीम प्रमोशनसाठी छत्तीसगडची राजधानी रायपूरला पोहोचली. यावेळी ‘सिम्बा’चा दिग्दर्शक रोहित शेट्टीने एक वेगळाच खुलासा केला.

ठळक मुद्देसाऊथचा एक चित्रपट बघत असताना मला ‘सिम्बा’ बनवण्याची कल्पना सुचली. हा चित्रपट बनायलाच हवा, असा निश्चय मी केला आणि आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे, असे त्याने सांगितले.  

रणवीर सिंग व सारा अली खान स्टारर चित्रपट ‘सिम्बा’ येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. चित्रपटात रणवीर एका भ्रष्ट पोलिस अधिका-याची भूमिका साकारताना प्रेक्षक पाहू शकणार आहेत. तूर्तास ‘सिम्बा’ची संपूर्ण स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काल रविवारी ‘सिम्बा’ची टीम प्रमोशनसाठी छत्तीसगडची राजधानी रायपूरला पोहोचली. यावेळी ‘सिम्बा’चा दिग्दर्शक रोहित शेट्टीने एक वेगळाच खुलासा केला. होय, ‘सिम्बा’ची कल्पना कशी सुचली, हे त्याने सांगितले.

साऊथचा एक चित्रपट बघत असताना मला ‘सिम्बा’ बनवण्याची कल्पना सुचली. हा चित्रपट बनायलाच हवा, असा निश्चय मी केला आणि आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे, असे त्याने सांगितले.  आता रोहित शेट्टी बघत होता तो साऊथचा चित्रपट कुठला असेल तर ‘टेम्पर’. होय, ‘टेम्पर’ हा साऊथचा चित्रपट पाहूनचं रोहितला ‘सिम्बा’ सुचला. ‘सिम्बा’ हा ‘टेम्पर’चाच हिंदी रिमेक आहे.

‘सिम्बा’मध्ये रणवीरचं का? या प्रश्नाचेही उत्तर रोहितने यावेळी दिले. ‘सिम्बा’ची कल्पना डोक्यात आली, त्यावेळी रणवीर हे एकच नाव माझ्या डोक्यात आले. त्याच्याशिवाय दुसरा कुणीच या चित्रपटात असू शकत नाही, असे मला वाटले, असे त्याने सांगितले.

‘सिम्बा’ सिनेमात रणवीर सिंग सोबत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती केली जात आहे. ‘टेम्पर’मध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र  ‘सिम्बा’मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे.  २८ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :सिम्बारोहित शेट्टीरणवीर सिंगसारा अली खान