Join us  

रोहित शेट्टीच्या अंदाजात पाहायला मिळणार अमिताभ- हेमाच्या या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 4:32 PM

काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने फराह खानसोबत एक फोटो शेअर करत, एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. मी लवकरच फराहसोबत एक चित्रपट घेऊन येतोय, असे त्याने म्हटले होते. अर्थात हा नवा चित्रपट कोणता, हे गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय.

ठळक मुद्देतूर्तास रोहित शेट्टी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीनेफराह खानसोबत एक फोटो शेअर करत, एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. मी लवकरच फराहसोबत एक चित्रपट घेऊन येतोय, असे त्याने म्हटले होते. अर्थात हा नवा चित्रपट कोणता, हे गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय. होय, अमिताभ बच्चन- हेमा मालिनी स्टारर एका सुपरडुपर हिट चित्रपटाचा रिमेक घेऊन रोहित शेट्टीफराह खान प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. हा चित्रपट कुठला तर ‘सत्ते पे सत्ता’. अमिताभ व हेमा यांचा ‘सत्ते पे सत्ता’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर ही बातमी वाचून तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली असणार, हे नक्की.

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, राज एन सिप्पींच्या दिग्दर्शनात बसलेल्या ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचे हक्क मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे प्रकरण कोर्टात आहे. हे प्रकरण लवकरच निकाली निघेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हक्क मिळेपर्यंत चित्रपट बनवणार नाही, यावर रोहित शेट्टी ठाम आहे. कुठल्याही चित्रपटाचा रिमेक बनवताना रोहित आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करतो. ‘सत्ते पे सत्ता’चे हक्क मिळवण्यात रोहित यशस्वी झालास तर साहजिकच, या चित्रपटाची कथा रोहितच्या ट्रेडमार्कसह वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येईल. ‘सत्ते पे सत्ता’ हा चित्रपट १९८२ मध्ये रिलीज झाला होता आणि बॉक्सआॅफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता.

या रिमेकच्या दिग्दर्शनासाठी रोहितने फराह खानची निवड केली आहे. तूर्तास रोहित शेट्टी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. या बिग बजेट चित्रपटात अक्की पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. याचवर्षाअखेरिस हा चित्रपट प्रदर्शित होईल.गतवर्षाच्या अखेरिस रोहितचा ‘सिम्बा’ रिलीज झाला होता. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत होता. ‘सिम्बा’ने बॉक्सआॅफिसवर धमाकेदार कमाई केली होती.

टॅग्स :रोहित शेट्टीफराह खान