Join us

​बिपाशाचा लाडका हबी करण बनणार रॉक स्टार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 16:56 IST

बिपाशा बसूचा लाडका हबी करण सिंह ग्रोवर एक अभिनेता आहे. पण कदाचित करणबद्दल एक गोष्ट तुम्हाला माहिती नसावी. ती ...

बिपाशा बसूचा लाडका हबी करण सिंह ग्रोवर एक अभिनेता आहे. पण कदाचित करणबद्दल एक गोष्ट तुम्हाला माहिती नसावी. ती म्हणजे, करणला गाण्याचे प्रचंड वेड आहे. चित्रपटाच्या सेटवर अनेकदा गाणी गुणगुणतांना त्याला तुम्ही पाहू शकता. आता करण आपला हा छंद पुढे नेऊ इच्छित आहे. केवळ इतकेच नाही तर संगीत क्षेत्रात नवी झेप घेऊ पाहतो आहे. होय, करण लवकरच एका इंटरनॅशनल म्युझिक बँडच्या सूरात सूर मिसळताना दिसणार आहे. ब्रिटीश म्युझिक बँड  डायनासोर पिल अपसोबत करण काम करताना दिसणार आहे.सूत्रांची मानाल तर, यासंदर्भात संगीताचे धडे घेण्याचा निर्णयही करणने घेतला आहे. करण याबाबतील प्रचंड उत्सूक आहे. याबददल तो म्हणाला, ह्यडायनासोर पिल अपह्णसोबत परफॉर्म करण्याची संधी माज्यासाठी मोठी संधी आहे. हा एक रोचक अनुभव असेल. संगीत क्षेत्रात मी काही करू शकतो, अशी आशा मला यामुळे वाटू लागली आहे. मला रॉक म्युझिक आवडतं आणि ह्यडायनासोर पिल अपह्ण बँड त्याच्या रॉक नंबर्ससाठी ओळखला जातो. या बँडसोबत काम करण्याचा अनुभव घेण्यास मी प्रचंड उत्सूक आहे. आता करण इतका उत्सूक आहे म्हटल्यावर त्याचा परफॉर्मन्स जबरदस्तच होणार.