Join us  

Video : रितेश देशमुख व जेनेलियाची धम्माल पार्टी, ‘झिंगाट’ गाण्यावर ‘झिंगाट’ डान्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 12:00 PM

शनिवारी रात्री झालेल्या या पार्टीचा व्हिडीओ जेनेलियाने शेअर करताच तो व्हायरल झाला.

ठळक मुद्दे  जेनेलिया व रितेश दोघेही देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत आणि ब-याचदा ते मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाने वीकेंडला धम्माल मस्ती केली आणि याची एक झलक चाहत्यांनाही पाहायला मिळाली. जेनेलियाने या धम्माल पार्टीचा धम्माल व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत आशीष चौधरी, शमिता बंगारगी, कुमकुम भाग्य स्टार शब्बीर अहलूवालिया आणि त्याची पत्नी कांची कौल असे सगळे सहभागी झाले होते. रितेश आणि जेनेलिया तर या पार्टीचे स्टार होते.या सहा मित्रांनी पार्टीत ‘सैराट’च्या ‘झिंगाट’ गाण्यावर तितकाच झिंगाट डान्स केला. शनिवारी रात्री झालेल्या या पार्टीचा व्हिडीओ जेनेलियाने शेअर करताच तो व्हायरल झाला.

व्हिडीओत सुरुवातीला जेनेलिया, कांची व शमिता दिसतात. यानंतर रितेश देशमुख आणि शब्बीरची एन्ट्री होती. नंतर सगळे मिळून अक्षरश: तुफानी डान्स करतात. इतके की, डान्स करता करता अक्षरश: जमिनीवर पडतात.

आत्तापर्यंत या व्हिडीओला अडीच लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.  कमेंट्सचाही पूर आला आहे. जबरदस्त, राडा आवडला भावा अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून रितेश  आणि जेनेलिया  या जोडीकडे पाहिले जाते. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. रितेश व जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच 8 वर्षे पूर्ण झाली आहेत.

  जेनेलिया व रितेश दोघेही देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत आणि ब-याचदा ते मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच जेनेलियाने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती व रितेश रोमँटिक अंदाजात दिसले होते.  तासाभरात या व्हिडीओला एक लाख ऐंशी हजाराहून जास्त लाइक्स मिळाले होते.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा