Join us  

सलमान खानने पुन्हा दाखवली दर्यादिली, रायझिंग स्टार 3 मधील स्पर्धकाला केली ही मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 1:27 PM

सलमान खान त्याच्या बीईंग ह्युमन या संस्थेद्वारे अनेक लोकांना मदत करत असतो. आता त्याने रायझिंग स्टार या कार्यक्रमातील एका स्पर्धकाला मदत केली आहे.

ठळक मुद्देआफताबच्या वडिलांनी घराच्या डागडुजीसाठी तीन लाख रुपयांचं कर्ज घेतले होते, ही गोष्ट सलमानला कळल्यानंतर त्याने आफताबच्या वडिलांचे कर्ज फेडले.

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान हा दर्यादिल असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. सलमान खान त्याच्या बीईंग ह्युमन या संस्थेद्वारे अनेक लोकांना मदत करत असतो. आता त्याने रायझिंग स्टार या कार्यक्रमातील एका स्पर्धकाला मदत केली आहे.

सध्या आपल्याला अनेक वाहिनींवर रिॲलिटी शो पाहायला मिळत असून या शो द्वारे अनेक मुलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे अतिशय गरीब घरातील, छोट्याशा गावांमधील मुलांना देखील नृत्य, कला यांसारख्या आपल्या कलांद्वारे लोकांपर्यंत पोहोचता येत आहे. अनेकांना या कार्यक्रमामुळे बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या संधी देखील मिळत आहेत. 

रायझिंग स्टार 2 या कार्यक्रमातील सगळ्याच चिमुकल्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले होते आणि आता या कार्यक्रमाचा विजेता आफताब सिंग बनला असून त्याला रायझिंग स्टारच्या ट्रॉफीसोबतच 10 लाख रुपये रक्कम देखील मिळाली आहे. आफताबची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असून त्याला मिळालेल्या या यशामुळे त्याच्या घराची आर्थिक परिस्थिती काही अंशी तरी बदल करता येईल अशी त्याला खात्री आहे. रायझिंग स्टार 2 या कार्यक्रमाचे विजेतेपद पटकवल्यानंतर आफताबला मिळालेली रक्कम त्याने बहिणाच्या लग्नासाठी वापरायची असे ठरवले आहे. 

 

रायझिंग स्टार या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी सलमान खानने हजेरी लावली होती. सलमान खान त्याच्या भारत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात आला होता. या कार्यक्रमातील सगळ्यांच स्पर्धकांचे परफॉर्मन्स प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. या कार्यक्रमात त्याने स्पर्धकांसोबत खूप मजा मस्ती केली होती. आफताबच्या आर्थिक परिस्थितीबद्दल कळल्यानंतर सलमान खानने त्याला एक मोठी मदत केली होती. आफताबच्या वडिलांनी घराच्या डागडुजीसाठी तीन लाख रुपयांचं कर्ज घेतले होते, ही गोष्ट सलमानला कळल्यानंतर त्याने आफताबच्या वडिलांचे कर्ज फेडले. यासाठी आफताबने सलमानचे धन्यवाद मानले असून मी आयुष्यात अतिशय मेहनत करून एकदा तरी सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळवेन असे आफताबने मीडियाशी बोलताना सांगितले आहे. 

टॅग्स :सलमान खान