Join us  

‘या’ कारणामुळे ऋषी कपूरला वैतागले त्यांच्या परिवारातील लोक; दिला अल्टिमेट्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2017 12:07 PM

काही दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केल्यावरून अभिनेता ऋषी कपूर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली ...

काही दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केल्यावरून अभिनेता ऋषी कपूर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. वास्तविक हे पहिल्यांदाच घडले असे नाही तर यापूर्वीदेखील वादग्रस्त ट्विटमुळे ऋषी कपूर अडचणीत आलेले आहेत. बºयाचदा तर त्यांचे ट्विट माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. आता पुढच्या काळात त्यांच्या ट्विटमुळे आणखी काही प्रताप घडू नये म्हणून त्यांच्या परिवाराकडूनच त्यांना अल्टिमेट््म देण्यात आला आहे. ऋषी यांची पत्नी नीतू कपूरने त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, ‘वादग्रस्त ट्विट करू नका अन्यथा अकाउंट बंद करा.’एका वेबसाइटला कपूर परिवाराशी संबंधित एका जवळच्या सूत्राने सांगितले की, ‘चिंटू अंकलला आम्ही कधीच असे म्हणू शकत नाही. बºयाचदा तर रणबीरला त्यांच्या ट्विटमुळे मानहानी पत्करावी लागली. त्यामुळे रणबीर पप्पा ऋषीच्या ट्विट प्रकरणामुळे पूर्णत: त्यांच्या विरोधात आहे. कारण सोशल मीडियाप्रती रणबीरचे विचार पप्पा ऋषीच्या विचारांच्या तुलनेत खूपच वेगळे आहेत, तर चिंटू अंकल नेहमीच हॅँगआउट करीत असतात. परंतु अशातही त्यांना यासर्व प्रकारापासून थांबविण्यासाठी आमच्यात अजिबात हिम्मत नाही. मात्र आता रणबीर आणि रिद्धिमाने धाडस करून मम्मी नितूला विनंती केली की, आता त्यांना ट्विटपासून दूर केले जावे. मुलांची विनंती ऐकून नितू यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, ऋषी यांना त्यांनी एकप्रकारचा अल्टिमेट््मच दिला आहे. सूत्रानुसार, नितू कपूरला असे वाटत आहे की, मद्यपान करून ट्विट करणाºया ऋषी यांना एक दिवस जेलची हवा खावी लागणार आहे. त्यामुळे आताच त्यांनी पतीला अल्टिमेट््म दिला आहे. त्यांनी पती ऋषीला स्पष्ट शब्दात बजावून सांगताना म्हटले की, एक तर तुम्ही ट्विटर अकाउंट बंद करा अन्यथा मी तुमच्या ट्विटरला फिल्टर आणि मॉडरेट करणार. ऋषीनेही पत्नी नितूचे म्हणणे ऐकले असल्याचे समजते. कारण त्यांच्या परिवारात नितू याच एकमेव अशा आहेत की, त्यांना ऋषी कपूर घाबरतात. काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांच्यावर त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून अश्लील व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ‘जय हो फाउंडेशन’ या एनजीओचे अध्यक्ष अफरोज मलिक यांनी म्हटले होते की, ‘आम्ही तुमच्यावर अल्पवयीन मुलांचे नग्न आणि अश्लील फोटो पोस्ट केल्यावरून पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत.’ आता ऋषी कपूर ट्विट करण्यावरून खरच स्वत:वर नियंत्रण ठेवणार आहेत काय? हे बघणे मजेशीर ठरेल.