Join us

ऋषी कपूरने म्हटले, ‘मी गुंड आहे... मी तर ट्विटरवर गुंडागर्दी करीत असतो!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 22:07 IST

पुन्हा एकदा अभिनेते ऋषी कपूर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. कारण त्यांनी म्हटले की, ‘मी तर बॉलिवूडमधील गुंडा ...

पुन्हा एकदा अभिनेते ऋषी कपूर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. कारण त्यांनी म्हटले की, ‘मी तर बॉलिवूडमधील गुंडा आहे.’ होय, ‘पटेल की पंजाबी शादी’ या चित्रपटाच्या मुलाखतप्रसंगी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले ऋषी कपूर बॉलिवूड लाइफ या संकेतस्थळाशी बोलत होते. प्रश्नोत्तराचा सिलसिला सुरू असताना ऋषी अचानकच असे काही बोलायला लागले की, सगळेच दंग राहिले. ऋषीने म्हटले की, ‘मै बॉलिवूड का गुंडा हूॅँ !’त्याचे झाले असे की, ऋषी यांना एक प्रश्न विचारण्यात आला. ‘चित्रपटात पटेल आणि पंजाबीविषयी सांगण्यात आले आहे. परेशजी गुजराती आहेत, तर तुम्ही पंजाबी आहात अशात तुम्ही कधी या मुद्द्याला अनुसरून आॅफस्क्रीन तक्रार केली काय ?’ बस्स हा प्रश्न ऐकू न ऋषी कपूरचा असा काही पारा चढला की, त्यांनी एकापाठोपाठ एक धासू वक्तव्य करण्यास सुरुवात केली. ऋषीने म्हटले ‘मै तो साला डाकू हॅूँ और परेश बेचारा तो बहुत सिधा आदमी है ! मै गुंडा हूॅँ ! मै तो ट्विटर पर भी गुंडागर्दी करता हूॅँ ! हर जगह करता हूॅँ ! किसी को छोडता थोडी ना हूॅँ ! वो तो बेचारा साधारण आदमी है ! वो मंत्री आदमी है लेकिन एक ब्रिलियंट अ‍ॅक्टर है!’ (सर्व संवाद हिंदीमध्ये) अर्थात ऋषीचे हे सर्व वक्तव्य चेष्टामस्करीत होते. यावेळी ऋषी यांनी हेदेखील सांगितले की, त्यांनी कुठल्या अटी, शर्तीवर हा चित्रपट साइन केला आहे. चित्रपट करण्याअगोदर ऋषीने निर्मात्यांना स्पष्ट शब्दात सांगितले होते की, जर चित्रपटात परेश रावलची भूमिका असेल तरच मी काम करणार. यावेळी ऋषी यांनी हेदेखील सांगितले की, आगामी काळात परेश रावलबरोबर एका बिग बजेट चित्रपटात काम करणार आहे. हा चित्रपट एका इंग्रजी चित्रपटाचा रिमेक असेल. यावेळी मी आणि माझी टीम काम करीत असल्याचेही त्याने सांगितले. ऋषी कपूर यांच्या मते, हा एक सामान्य चित्रपट असून, समाजाला संदेश देणारा आहे. चित्रपट इंटर कास्ट, इंटर कल्चर आणि इंटर रिलिजनमध्ये होणाºया विवाहाची कथा आहे. चित्रपटात ऋषी आणि परेश रावल यांच्याव्यतिरिक्त वीर दास, पायल घोष यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १५ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.